रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशकातील खासगी ट्रॅव्हल बस अपघातप्रकरणी काय कारवाई झाली? सरकारने विधिमंडळात दिले हे उत्तर

डिसेंबर 20, 2022 | 3:12 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20221008 WA0027 e1665207771559

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक येथे खाजगी ट्रॅव्हल बस अपघातात १२ प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागला. तसेच यामध्ये ४१ प्रवासी जखमी झाले. या घटनेची सखोल चौकशी करून ३० प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असतांना ५२ प्रवाश्यांची वाहतूक करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच अपघातात मृत व जखमी व्यक्तींना शासनाने जाहीर केलीली मदत तातडीने देण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सुचनेद्वारे केली.

लक्षवेधी सूचना मांडताना छगन भुजबळ म्हणाले की, दि.८ ऑक्टोंबर २०२२ रोजी नाशिक येथे खाजगी ट्रॅव्हल बस व आयशर ट्रक यांच्यात अपघात होवून खाजगी ट्रॅव्हल बस पेटल्यामुळे १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर ४१ प्रवाशी गंभीर जखमी झाले. या अपघाताची चौकशी करून अपघाताची कारणे निश्चित करण्याची आवश्यकता आहे. या अपघातग्रस्तांची भेट घेतल्यानंतर मा.मुख्यमंत्री यांनी मयतांच्या वारसांना ५ लाख तर जखमींना २ लाखाची मदत जाहीर केलेली होती. तसेच पंतप्रधान निधी मधूनही २ लाखाची घोषणा केंद्राकडून करण्यात आलेली होती. मात्र मृतांच्या वारसांना व जखमींना अद्यापपर्यंत शासनाकडून मदत मिळालेली नसल्याची तक्रार आहे.त्यामुळे शासनाने जाहीर केलेली शासकीय मदत वितरीत झाली नसेल तर ती लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

तसेच सदर घटनेची सखोल चौकशी करून अपघात होवू नये म्हणून शासनाने उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता. यावर शासनाने तातडीने कार्यवाही करावी. केवळ चालकावर कारवाई न करता क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हलसवर कारवाई करा अशी मागणी छगन भुजबळ मागणी छगन भुजबळ यांनी सभागृहात केली.

त्याचबरोबर नाशिक मुंबई रस्त्यावर ठाणे ते पडघा दरम्यान कंटेनरमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याने मुंबई-नाशिक प्रवासात ५ तासाहून अधिक वेळ लागत आहे. यासाठी येथे पोलिसांकडून ट्रॅफिकचे नियोजन करण्यात यावे. तसेच नाशिक पुणे महामार्गावरील देखील वाहतुकीची कोंडी सोडवावी याबाबत सभागृहाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले.

यावेळी उत्तरात मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की, या अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अधिक चौकशी करून दोषी आढळल्यास खाजगी ट्रॅव्हल्सच्या मालकावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल. मृत व जखमी व्यक्तींना शासनाने जाहीर केलेली मदत देण्यात आलेली आहे. मात्र अद्याप मिळालेली नसल्यास तातडीने वितरीत करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच नाशिक मुंबई व नाशिक पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आणि वाहतुकीमध्ये शिस्तबध्द पणा आणण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवून पोलीस पेट्रोलिंग आणि योग्य ती उपाययोजना केली जाईल येईल अशी माहिती त्यांनी उत्तर देताना दिली.

Nashik Private Travel Bus Fire Accident Assembly Session Demand

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई थेट सरपंचपदी विजयी

Next Post

सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासंदर्भात राज्य सरकारने दिली ही ग्वाही

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
savitarybai

सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासंदर्भात राज्य सरकारने दिली ही ग्वाही

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011