नाशिक – मराठा आरक्षणावर केंद्र राज्यावर व राज्य केंद्रावर जबाबदारी ढकलत आहे. पण, मार्ग काय काढणार ते सांगा. २७ तारखे पर्यंत समाजाने शांत राहावे, आपली भूमिका त्या दिवशीच ठरेल अशी माहिती छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी नाशिक येथे शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते म्हणाले की ज्यावेळी संभाजी छत्रपती बोलतो, त्यावेळी संभाजी बोलत नाही, शिवाजी, शाहू महाराज यांची भूमिका मांडतो. आतापर्यंत मी सांमज्यसाची भूमिका घेतली आहे. पण, काही लोक टीम टीम करत आहेत. आंदोलन कसे करायचे हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. मी शांत आहे, संयमी आहे, शिवाजी, शाहू महाराज यांचे संस्कार आहेत. महाराजांनी अनेकवेळा तह केले. सध्या लोकांचे जीव वाचण्याची गरज आहे. मी पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढणार. तज्ञाशी चर्चा करणार. २७ तारखेला मुंबईत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांशी भेट घेणार व समाजाची भूमिका मांडणार. आमदार खासदार यांना सांगणे आहे, ज्यावेळी माझी भूमिका मांडली जाईल तेव्हा माझं तुझं करत बसू नका असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी टीका करणा-यांवर निशाणा साधत ते म्हणाले की, महाराज शांत आहेत ते म्हणत आहे, आधी कुठे होते, बोलणारे कुठे आहेत, आक्रमक होण्यासाठी दोन मिनिटे लागणार नाही. मी समाजचे नेतृत्व करत नाही भूमिका मांडतो. ४ एप्रिलला स्टेजवर जाण्याचे कोणाचे धाडस होते का, मी गेलो होतो बोलायला, आझाद मैदानात, माझ्यावर टीका करणारे तेव्हा कुठे होते असा प्रश्नही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी सारथी संस्थेचे शाहू महाराज यांचे नाव काढून टाका, काहीच करत नाही, मुख्यमंत्रीनी त्यात लक्ष घालावे असेही त्यांनी सांगितले. भाजप मोर्चे काढणार ही त्यांची भूमिका, पण सोल्युशन द्या मार्ग काढा. यावेळी त्यांनी मराठवाडा मध्ये जायचे आहे, त्यानंतर आपली भूमिका मांडणार २७ तारखेला मांडणार असल्याचेही सांगितले. २७ मेपर्यंत राज्य सरकारने अभ्यास करावा.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ४ वेळा वेळ मागितली, पण अजून मिळाली नाही, पुन्हा संपर्क करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.