सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकच्या प्रसाद पवार यांच्या छायाचित्रांचे मंत्रालयात प्रदर्शन; अशी आहे त्याची खासियत

by Gautam Sancheti
एप्रिल 19, 2022 | 5:42 pm
in इतर
0
unnamed 2

 

नाशिकच्या प्रसाद पवार यांच्या छायाचित्रांचे मंत्रालयात प्रदर्शन

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत असणाऱ्या पुरातत्व विभागामार्फत ऐतिहासिक वास्तुंचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. राज्यातील मोडकळीस आलेले गड-किल्ले यांचे जतन करून ती पुन्हा पर्यटनासाठी खुली करण्यात आली आहेत. याचबरोबर औरंगाबाद येथील अजिंठा लेण्यातील चित्रे २००० वर्षे जुनी आहेत. त्या चित्रांना डिजिटल स्वरूपाने पुनर्संचयित करण्याचे कामही सुरू आहे. हे पुनर्संचयित करण्यात आलेल्या चित्रांचे तसेच गड-किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात भरविण्यात आले आहे. भारताची संस्कृती व परंपरा जतन करून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून शासन करीत असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.

गौतम बुद्धांचे विविध अवतार, त्यांच्या पुनर्जन्माच्या गोष्टी, नैतीक मुल्यांसह प्रेरित करणाऱ्या जातक कथा, लेण्यांच्या भित्तीवरील कोरीव काम, याचबरोबर शिवकालीन किल्ले जतन करण्यापूर्वी आणि जतन केल्यानंतरची छायाचित्रे येथे अनुभवयास मिळतात. आमदार संजय दौंड, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त वीरेंद्र सिंह, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी आवर्जुन या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमास हजेरी लावली.

अजिंठा लेण्यांमधील दोन हजार वर्षे जुने चित्रांचे रंग आजही आपणास पहावयास मिळतात. मात्र, मोठ्या प्रमाणात हे रंग पुसट अथवा निघून गेले आहेत. त्यामुळे अनेक चित्रांचे अर्थ स्पष्ट होत नाहीत. अजिंठा येथील २९ लेण्यांमध्ये जातक कथा सांगणारी चित्रे आहेत. या कथांमधून सांस्कृतिक दुवे तसेच नीतिमूल्ये दिसून येतात.
या लेण्यातील सातवाहनकालीन चित्रकला पाहून तत्कालीन चित्रकारांचे कौशल्य लक्षात येते. जागतिक वारसा असलेली अजिंठा लेणीतील अभूतपूर्व कला जतन करून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचविता यावी यासाठी या चित्रांचे डिजिटल स्वरूपात पुनर्संचयित करण्याचे काम राष्ट्रीय ख्यातीचे संशोधक छायाचित्रकार प्रसाद पवार यांच्या फाऊंडेशनमार्फत सुरू आहे. अशाच पुनर्संचयित केलेल्या 350 छायाचित्रांचे प्रदर्शन मंत्रालयात २२ एप्रिलपर्यंत भरविण्यात आले आहे.

राष्ट्रीय ख्यातीचे संशोधक छायाचित्रकार प्रसाद पवार यांची रिस्टोरेशन आर्टिस्ट अशीही ओळख आहे. २००० वर्षांपूर्वीची संस्कृती, वारसा, जीवनशैली चित्रकलेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचचावी यासाठी ती जतन करणे आवश्यक असल्याने त्यांनी १९८९ पासून संशोधन सुरू केले. २००७ पासून पुरातत्व शास्त्र विभागाच्या परवानगीने या लेण्यांतील चित्रांची छायाचित्रे काढण्यास सुरवात केली. भारतातील चित्र संस्कृती, वास्तुरचना, जीवन, तत्वज्ञान, प्रगतरचना, सामाजिक जीवन, प्राणी, मानव यांचे संबंध हे या चित्रातून चित्रकारांनी त्या काळात मांडण्याचा अप्रतिम प्रयत्न केला असल्याचे श्री. पवार सांगतात. त्यावेळी लोक विशेषत: महिला आणि राजे-महाराजे जे अलंकार, कपडे वापरत असत त्यातील प्रगतीही या चित्रांमधून स्पष्ट होते.

1000 शब्दांचे वर्णन एकाच चित्रातून व्यक्त होते किंवा आपण वाचन केल्यावर त्या काळातील हुबेहुब चित्र उभे राहणे थोडे कठीण आहे, मात्र चित्रातून ते लगेच स्पष्ट होते. त्यामुळे लेण्यांमधील ही चित्रे आपल्याला दोन हजार वर्षापूर्वींच्या जीवनशैलीत घेऊन जातात असेही श्री.पवार यांनी सांगितले. या महत्त्वपूर्ण इतिहासाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही या चित्रांचे फोटो काढतो आणि जे रंग निघून गेले आहेत, तिथे कशा प्रकारचे रंग असतील याचे संशोधन करून डिजिटल स्वरूपात ती चित्रे रिस्टोर करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचेही श्री प्रसाद पवार यांनी सांगितले. प्रसाद पवार फाउंडेशनच्यावतीने २०१२ पासून जगभर १०० कोटी लोकांपर्यंत भारतीय चित्र संस्कृतिचा महत्त्वाचा पुरावा प्रदर्शित करण्यासाठी पुढाकाराने प्रयत्न करीत आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन करणे आणि जगभर पोहोचविणे महत्त्वाचे असल्याचेही श्री पवार यांनी सांगितले.

या प्रदर्शनात अंजिठा लेणीची सफर होतेच याचबरोबर नांदेड येथील माहूर किल्ला, लातूर येथील औसा, पुणे येथील तोरणा किल्ला, नाशिक येथील अंकाई किल्ला अशा अनेक शिवकालीन किल्ल्यांचे जतन करण्यापूर्वीचे आणि जतन नंतरचे छायाचित्र या प्रदर्शनात आपणास पहावयास मिळतात. पाषाणयुगापासून मध्ययुगापर्यंत काताळातील कोरीव खोदचित्रही येथे पहावयास मिळतात.

  • श्रद्धा उमेश मेश्राम
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अनाधिकृत व अतिक्रमण असलेल्या मशिदींवर भोंग्यांना परवानगी देऊ नये: प्रदीप पेशकार

Next Post

कोल्हापूर विमानतळासाठी राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

VO7rnvQq 400x400 e1757903064573
राष्ट्रीय

संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण खरेदी नियामावलीला दिली मंजुरी…हा होणार फायदा

सप्टेंबर 15, 2025
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन 5 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन…आज शपथविधी

सप्टेंबर 15, 2025
Untitled 7
संमिश्र वार्ता

समृध्दी महामार्गावर खिळे? अखेर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सप्टेंबर 15, 2025
Screenshot 20250915 070634 Facebook
संमिश्र वार्ता

मविप्रच्या वार्षिक सभेच्या व्यासपीठावर गँग्स ऑफ वासेपुर…सरचिटणीसांनी पोस्ट केला हा फोटो

सप्टेंबर 15, 2025
G008bSZXIAAjtvu
मुख्य बातमी

क्रीकेटच्या मैदानात सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानचा धुव्वा…हस्तांदोलन टाळलं, श्रध्दांजली अर्पण केली

सप्टेंबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
Next Post
kolhapur airport

कोल्हापूर विमानतळासाठी राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011