नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून नाशिक रोड विभागात आज दसक येथे दि. 31-05-2023 रोजी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. यावेळी तीन मजली आरसीसी अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले व नाशिक रोड सामनगाव रोड पॉलिटेक्नीक कॉलेज येथे 6 ते 7 अनधिकृत घरांचे बांधकाम तोडण्यात आले..
मा. आयुक्त सो यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांच्या निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त तथा नाशिक रोड विभागीय अधिकारी मदन हरीश्चंद्र तसेच नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील, पुर्व चे राजाराम जाधव, पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्यामार्फत सदर अनधिकृत अतिक्रमणे काढण्याची कारवाई करण्यात आली.
कारवाई दरम्यान नाशिक पश्चिम विभागाचे विकी जाधव, प्रवीण बागूल, नवीन नाशिक विभागाचे प्रदीप जाधव, सातपूर विभागाचे तानाजी निगळ, व भगवान सुर्यवंशी आदी कर्मचारी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरीक्त पोलिस बंदोबस्त व मनपाचे सुरक्षा रक्षक कारवाई दरम्यान हजर होते. कारवाई करतेवेळी अनधिकृत अतिक्रमण धारकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता कारवाई दरम्यान 1 फोकलॅन 2 जेसीबी सहाही विभागचे पथक तसेच नगर रचना विभागचे उपअभियंता विशाल गरुड व सहा.अभियंता ख्रुळे हे उपस्थित होते.
नागरिकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकामे, पत्र्याचे शेड, टपऱ्या अशा प्रकारचे अतिक्रमण काढून घेण्यात यावे. अन्यथा अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल आणि कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसुल करण्यात येईल. तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्त अतिक्रमण यांनी सांगितले आहे.
Nashik Polytechnic College Demolished Building