मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेने आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. नजिकच्या काळात महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेने नाशिकसाठी एका समितीची स्थापना केली आहे. राज्य सरकारने घेतलेले विविध निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ही समिती काम करणार आहे. नाशिकची समिती ८ सदस्यीय आहे.
या समितीमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे.
भाऊसाहेब चौधरी – सचिव
दादा भुसे – पालकमंत्री
हेमंत गोडसे – खासदार
सुहास कांदे – आमदार
अजय बोरस्ते – जिल्हाप्रमुख
प्रवीण तिदमे – महानगरप्रमुख
राजू लवटे – सहसंपर्कप्रमुख
Nashik Politics Balasahebanchi Shivsena Committee