नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत आस्थपनेवर नेमणुकीस असलेले पोलीस उपाआयुक्त व सहायक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी यांच्या बदल्या केल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलात हे फेरबदल केल्याचे बोलले जात आहे.
या बदल्यांमध्ये परिमंडळ दोनच्या डिसीपी आणि एसीपीची बदली करण्यात आली असून डिसीपी चंद्रकांत खांडवी यांची मुख्यालयात तर एसीपी अंबादास भुसारे यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. मोनिका राऊत यांच्याकडे आता परिमंडळ दोनच्या डिसीपीचा पदभार तर आनंदा वाघ हे नाशिकरोड विभागाचे नवे एसीपी असणार आहेत. आता शहर पोलिसांच्या फेरबदलानंतर तरी गुन्हेगारी आटोक्यात येणार का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
असे आहेत फेरबदल
श्रीमती मोनिका नं.राऊत ( पोलीस उप आयुक्त, मुख्यालय)
बदली पोलीस उप आयुक्त, परिमंड-2,नाशिक शहर
चंद्रकांत खांडवी ( पोलीस उप आयुक्त, परिमंड-2)
बदली पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, नाशिक शहर
अंबादास भुसारे ( सहायक पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग)
बदली सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा, नाशिक शहर
आनंदा वाघ ( सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा)
बदली सहायक पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग, नाशिक शहर
या प्रमाणे अंतर्गत नेमणुका करण्यात आल्या आहेत.