मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशकातील पोलिस निरीक्षकावर अखेर गुन्हा दाखल; धमकी देणे आणि खंडणी मागणे भोवले

by India Darpan
मे 6, 2023 | 4:15 pm
in संमिश्र वार्ता
0
court 1

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चार लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी ही खंडणी मागण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, की आ. सुहास कांदे हे एनडीसीसी. बँकेचे उपाध्यक्ष असताना एका महिलेने काही इसमांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा १० नोव्हेंबर २०१६ रोजी दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-२ चे तत्कालीन पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर हे करीत होते. नीलेश माईनकर यांनी गुन्ह्यातील आरोपींना भीती दाखवून मला आरोपी करून विनाकारण या गुन्ह्यात गोवण्याची धमकी दिल्याचे कांदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

त्यादरम्यान, मला अटक होऊ नये यासाठी योग्य तो कायदेशीर मार्ग अवलंबत होतो. तरीही या गुन्ह्याशी माझा वैयक्‍तिक कोणताही संबंध नसताना या गुन्ह्यात २३ डिसेंबर २०१६ रोजी समजपत्र देऊन पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यामुळे मला या गुन्ह्यात अटक होऊन माझ्या राजकीय कारकीर्दीस धोका निर्माण होऊ नये म्हणून मी जिल्हा सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अर्ज केला होता. त्यानुसार मला कोर्टाने अंतरिम अटकपूर्व जामीन दिला होता.

त्यानंतर मी तपास अधिकारी माईनकर यांच्या म्हणण्याप्रमाणे चौकशीकामी त्यांच्यासमक्ष हजर राहून माझा जबाब दिला होता, असेही कांदे यांनी म्हटले आहे. नीलेश माईनकर यांनी मला धमकी देऊन व ब्लॅकमेल करून माझ्याकडे चार लाख रुपयांची मागणी केल्याने ७ जानेवारी २०१७ रोजी तत्कालीन पोलीस आयुक्‍तांकडे तक्रार अर्ज दिला होता. तसेच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याकडे ९ जानेवारी २०१७ रोजी माईनकर यांच्या विरोधात फिर्याद दाखल होण्यासाठी अर्ज दिला असल्याचे कांदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे; परंतु वेगवेगळ्या खात्यांकडे तक्रारी देऊनदेखील तेच तपासी अधिकारी असल्याने वेळोवेळी त्यांनी मला “माझ्याविरुद्ध तक्रार दिल्यास तुला केसेसमध्ये पुरता अडकवीन,” अशा धमक्या देऊन दबाव आणत बेकायदेशीर रकमेची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी उच्च न्यायालयाने सर्व गोष्टींची शहानिशा करून कांदे यांना दोषमुक्‍त केले होते. उच्च न्यायालयाकडून न्याय मिळाल्याने कांदे यांनी माईनकर यांच्याविरुद्ध सी. आर. पी. सी. कलम १५६ (३) अन्वये न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश कोर्ट नं. ६ यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार माईनकर यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३८४, ३८५, ३८९ सह लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम ७, १३ प्रमाणे फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्‍त सिद्धेश्‍वर धुमाळ करीत आहेत. माईनकर यांना महाराष्ट्रदिनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष पदक मिळाले होते. त्यानंतर त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. त्यापाठोपाठ गंभीर स्वरूपाच्या प्रकरणावरून माईनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Nashik Police Inspector rebuttal FIR Lodged

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वयाच्या १२व्या वर्षी डोक्यावरचे छत गेले.. आता वयाच्या ९३व्या वर्षी निकाल आला… हायकोर्टाचा ८१ वर्षांनी न्याय

Next Post

सातपूर एमआयडीसीत कार वीजेच्या खांबावर आदळली; कार चालकाचा मृत्यू

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

सातपूर एमआयडीसीत कार वीजेच्या खांबावर आदळली; कार चालकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

Untitled 79

राज्यातील या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

जून 24, 2025
indian army e1750762947859

संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण

जून 24, 2025
crime 88

धाडसी घरफोडीत चोरट्यांनी पावणे नऊ लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला…अशोका मार्ग भागातील घटना

जून 24, 2025
fir111

बाली येथील सहलीचे आमिष दाखवत पैसे गोळा करून यात्रा कंपनीने ग्राहकांना घातला गंडा

जून 24, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण आठ निर्णय….

जून 24, 2025
CM

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011