नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमली पदार्थ बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या दोघांच्या शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मुसक्या आवळल्या. राशीत गुलाब मन्सुरी (वय ४२, ता. निफाड) आणि प्रितीश जाधव (वय ३१, आडगाव शिवार) अशी संशयीताची नावे आहेत. युनिट चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
गुप्त बातमीदाराच्यामार्फत जाधव मळा, जकात नाक्याच्या बाजूला आडगाव शिवार येथे संशयित आरोपी वॅगनार कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीसाना मिळाली होती. त्यानुसार पथकाने जाधव मळा, आडगाव शिवार येथे सापळा लावला होता . त्या ठिकाणी संशयित एका कारमधील गाजा दुसर्या कारमध्ये लोड करीत होते. संशयित आरोपी राशीत गुलाब मन्सुरी (वय ४२, ता. निफाड) आणि प्रितीश जाधव (वय ३१, आडगाव शिवार) यांना शिताफीने पकडून ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी संशयितांच्या ताब्यातून ६१ किलो १४० ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ, दोन मोबाईल फोन, दोन कार असा एकूण १४ लाख ५३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर गुन्ह्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी त्यांना आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संशयितांवर आडगाव पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत.
ही कामगिरी आयुक्त जयंत नाईक नवरे, गुन्हे शाखा पथक, नाशिक शहर पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट एकचे विजय ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, किरण शिरसाठ, प्रवीण कोकाटे, पोलीस हवालदार नाझीम पठाण, प्रदीप म्हसदे, योगीराज गायकवाड, शरद सोनवणे, रामदास भडांगे, कवीश्वर खराटे, धनंजय शिंदे, पो/ना विशाल देवरे, अण्णासाहेब गुंजाळ यांनी केली आहे.
Nashik Police Crime Action 2 Arrested