नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर पोलिसांनी पुन्हा एकदा हद्दपारीचे शस्त्र हाती घेतले आहे. त्यामुळेच भद्रकाली आणि मुंबईनाका पोलिस ठाणे हद्दीतील नऊ सराईतांना तडिपार करण्यात आले आहे. त्यातील सहा जणांना दोन वर्षे, एकास एक तर उर्वरीत दोघांना सहा महिने कालावधीसाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी केली.
तांबे यांनी काढलेल्या आदेशानुसार, आरबाज माईन बागवान (रा.म्हाडा कॉलनी,भारतनगर), सलमान युसूफ अत्तार (रा.नागजी चौक), जुबिन उर्फ रजा जयनोउद्दीन सय्यद (रा.खडकाळी,भद्रकाली), किशोर बाबुराव वाकोडे (रा.कोळीवाडा,कथडा), सुलतान बाबू शेख (रा.नुराणी गल्ली,भारतनगर) व अफताब उर्फ रिम्मी नजीर शेख (रा.घोडेस्वारबाबा दर्गाजवळ भद्रकाली) अशी प्रत्येकी दोन वर्ष हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
कुणाल सुधाकर एखंडे (रा.शांतीनगर,म.बाद) यास एक वर्ष तर आकाश सुरज परदेशी (रा.संभाजीचौक,नानावली) व अक्षय बाळासाहेब भालेराव (रा.नागसेननगर,वडाळानाका) यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी तडिपार करण्यात आले आहे. त्यातील आरबाज बागवान व सलमान अत्तार यांची संघटीत गुन्हेगारी लक्षात घेवून त्यांच्याविरूध्द महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये हद्दपारीचे आदेश काढण्यात आले आहेत.
Nashik Police Crime 9 suspects action