नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुन्ह्यात आरोपीतांविरुद्ध वाढीव कलम लावून आरोपींवर कारवाई करण्याकरिता १० हजार रुपयाची लाच घेतांना चांदवड पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार हरी जानू पालवी (५१) हे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी करून त्यातील पहिला हप्ता १० हजार रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहात मिळून आले.
या कारवाई बाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की,तक्रारदार यांचे त्यांच्या भावासोबत शेत जमिनीच्या वहीवाटीवरून वाद झाल्याने चांदवड पोलीस स्टेशन येथे तक्रारदार व त्यांच्या भावाचे एकमेकाविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. तक्रारदार यांच्याकडून दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीतांविरुद्ध वाढीव कलम लावून आरोपींवर कारवाई करण्याकरिता तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष २० हजार रुपये लाचेची मागणी करून त्यातील पहिला हप्ता रुपये १० हजार लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना पालवी रंगेहात मिळून आले. त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यशस्वी सापळा अहवाल
*युनिट -* ला.प्र.वि. धुळे
*तक्रारदार-* पुरुष, वय 59 वर्ष
*आलोसे– श्री. हरी जानू पालवी,वय-51 वर्ष,पोलीस हवालदार ब.नं. 429, वर्ग 3, नेमणूक चांदवड पोलीस स्टेशन,ता. चांदवड,जि.नाशिक. *लाचेची मागणी*-20,000/-रु. दि. 01/06/2023
*लाच स्विकारली-* 10,000/- रुपये. (पहिला हफ्ता)
*हस्तगत रक्कम*– 10,000/- रुपये.
*लाचेचे कारण -*. यातील तक्रारदार यांचे त्यांच्या भावासोबत शेत जमिनीच्या वहीवाटीवरून वाद झाल्याने चांदवड पोलीस स्टेशन येथे तक्रारदार व त्यांच्या भावाचे एकमेकाविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. तक्रारदार यांच्याकडून दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीतांविरुद्ध वाढीव कलम लावून आरोपींवर कारवाई करण्याकरिता तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष 20,000/- रुपये लाचेची मागणी करून त्यातील पहिला हप्ता रुपये 10,000/- लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना आलोसे रंगेहात मिळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .
*सापळा अधिकारी-*
*मंजितसिंग चव्हाण,*
पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.धुळे.
9922447946
*पर्यवेक्षण अधिकारी-*
*श्री अभिषेक पाटील,*
पोलीस उपअधीक्षक,
ला.प्र.वि.,धुळे.
8888881449
*सापळा पथक*-
राजन कदम,संतोष पावरा, रामदास बारेला ,मकरंद पाटील ,गायत्री पाटील, प्रवीण पाटील ,चालक जगदीश बडगुजर
सर्व नेमणूक ला.प्र.वि.धुळे