नाशिक – विनाकारण शहरात फिरणाऱ्यांवर शहर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. कलम १४४ लागू असतानाही ज्या व्यक्ती विनाकारण घराबारे बाहेर दिसत आहेत त्यांची थेट रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. शनिवारी दिवसभरात पोलिसांनी एकूण ४३४ जणांची अशी टेस्ट केली. त्यात एकूण १९ जण कोरोना बाधित असल्याचे दिसून आले आहे. या सर्वांना तातडीने कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. म्हणजचे, विनाकारण घराबाहेर पडून अनेक जण कोरोनाचा संसर्ग पसरवित असल्याचे स्पष्ट होत आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे. तसेच, मास्क नसण्यासह विविध प्रकारचा दंडही पोलिसांकडून वसूल केला जात आहे. शनिवारी दिवसभरात पोलिसांनी हजारो रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शनिवारी दिवसभरातील कारवाई अशी