नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विकासाचा समग्र दृष्टिकोन ठेवून जिल्ह्याच्या विकासामध्ये क्रेडाई ने नेहमीच भरीव योगदान दिले असून पिंपळगाव क्रेडाई ने देखील या राष्ट्रीय स्तरावरील अनुभवाचा फायदा करून घेऊन पिंपळगाव येथे प्लॅन सिटी या संकल्पनेवर कार्य करावे असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. पिंपळगाव क्रेडाईच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
याप्रसंगी मंचावर आ. दिलीप बनकर, सरपंच भास्कर बनकर, राष्ट्रीय क्रेडाई च्या सल्लागार समिती (घटना) प्रमुख जितूभाई ठक्कर, राष्ट्रीय क्रेडाई च्या अकॅडमी समिती प्रमुख अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल, प्रांताधिकारी शुभांगी पाटील, तहसीलदार घोरपडे, भागवत बोरस्ते, सतीश मोरे, मावळते अध्यक्ष दत्तात्रय निफाडे हे उपस्थित होते. पिंपळगाव ही आशियातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ असून व्यवसायाचा अधिक विस्तार झाला तर पायाभूत सुविधांची गरज भासते असेही डॉ. भारती पवार यांनी नमूद केले. याप्रसंगी बोलताना आमदार दिलीप बनकर म्हणाले की नाशिकला लागून असणाऱ्या पिंपळगाव मध्ये विकासाच्या अपरिमित संधी असून येथील व्यवसाय, व्यापार तसेच राहणीमानात सकारात्मक बदल होत आहेत. शासन पिंपळगावकरांसोबत असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.
राष्ट्रीय क्रेडाई च्या सल्लागार समिती (घटना) प्रमुख जितूभाई ठक्कर यांनी आपल्या मनोगतात येथील कामगारांच्या स्किल डेव्हलपमेंट साठी पिंपळगाव क्रेडाई ने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. राष्ट्रीय क्रेडाई च्या अकॅडमी समिती प्रमुख अनंत राजेगावकर यांनी एन. एम. आर. डी. ए. च्या मास्टर प्लॅनमध्ये पिंपळगाव क्रेडाई ने मत देण्याची सूचना केली. याप्रसंगी सरपंच भास्कर बनकर व मावळते अध्यक्ष दत्तात्रय निफडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. पिंपळगाव क्रेडाई च्या आगामी योजनांबाबत बोलताना नूतन अध्यक्ष मोतीराम पवार म्हणाले की, उत्कृष्ट दर्जाची कमी खर्चातील घर बांधणे तसेच पिंपळगाव क्लीन सिटी साठी क्रेडाई पिंपळगाव कार्य करेल तसेच सदस्यांच्या प्रशिक्षणासाठी देखील नियमित उपक्रम आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पिंपळगाव व निफाड परिसरातील बांधकाम व्यावसायिक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रेडाई पिंपळगावची नूतन कार्यकारिणी अशी –
अध्यक्ष – मोतीराम पवार , माजी अध्यक्ष – दत्तात्रय निफाडे , उपाध्यक्ष – संदीप कुशारे व संदीप कोचर , सचिव- अनिल पुरकर , सहसचिव – आनंद ढोकले , कोषाध्यक्ष – विलास झेंडफळे , गिरीश मोरे , विक्रांत मोरे , मॅनेजिंग कमिटी – सुधाकर मेंगणे, शशिकांत जाधव , रफिक शेख , नयनेश संघवी , देवेंद्र देशमाने , प्रीतेश छाजेड .
Nashik Pimpalgaon Baswant Credai New Body
Real Estate Builders Construction