नाशिक – नाशिकमधील सातपुर येथील क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालयात भारत सरकारने घोषित केलेल्या विशेष अभियान २.० आणि स्वछता अभियान २ ते ३१ ऑक्टोबर् २०२२ या कालावधीत राबवण्यात येत आहे. या अभियानात प्रादेशिक कार्यालय, नाशिक येथे खालील उपक्रम राबविण्यात आले.
१. ज्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर होत नव्हता आणि ज्यांची दुरुस्तीची किंमत ही त्या वस्तूच्या किमतीपेक्षा जास्त लागत होती जसे की थिंक लाइनस, की बोर्ड्स, टाइप रायटर्स, लिपी प्रिंटर्स, फॅक्स मशीन्स, युपीएस, मॉनिटर्स, माउस, फोटो कॉपी टोनर्स, प्रिंटर टोनर आणि टेलिफोन्स त्या सर्व वस्तुचा लिलाव करून काढून टाकण्यात आले.
२. जुन्या फायलींचाही आढावा घेण्यात आला आणि मॅन्युअलमध्ये दिलेल्या तरतुदींनुसार, अंदाजे ९५० फायली काढून टाकण्यात आल्या आणि ९०० चौरस फुटांपेक्षा जास्त जागा मोकळी करण्यात आली.
३. कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली आणि केळी, पेरू, कस्टर्ड अॅपल, चिकू, स्नेक प्लांट, झेंडू आणि इतर सजावटीच्या झाडांची लागवड करण्यात आली आणि कार्यालयाच्या आवारात अंदाजे ७५ फुलझाडांच्या कुंड्या देखील ठेवण्यात आले.
४. अनेक ग्राहक आणि निवृत्तीवेतनधारकांना आधारच्या अप-डेशन बाबत अडचणींचा सामना करावा लागत होता, म्हणून आधार दुरुस्ती आणि जीवन प्रमाणपत्र अप-डीएशनसाठी कार्यालयात कायमस्वरुपी कॉमन सर्विस सेंटर (सी एस सी) केंद्र सुरू करण्यात आले आहे. या अभियाना मुळे सर्व भविष्य निधी कार्यालयाचा कायापालट घडवण्यात आला आहे व सर्व भविष्य निधी कर्मचारी, सभासद व निवृत्ती वेतन धारक त्याचा सुखद अनुभव घेत आहे. त्यामुळे कार्यालयात काम करण्यास ही प्रसन्नतेचे वातावरण तयार झाले आहे. अशी माहिती क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अनिल कुमार प्रीतम यांनी दिली.