नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत 16 जून 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारकांनी या अदालतीत सहभाग घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार,आयोजित करण्यात आलेल्या या पेन्शन अदालतीत निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्ती वेतनासंबंधित समस्या आणि मागण्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील प्रधान महालेखकार कार्यालय(लेख व हकदारी)-1 चे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मुंबईतील प्रधान महालेखाकार कार्यालयामार्फत पेन्शन धारकांच्या सोईसाठी साप्ताहिक ऑनलाईन पेन्शन संवाद, 24X7 तास टोल फ्री नंबर 1800220014 व व्हाईस मेल नंबर 020-71177775, माहिती वाहिनी, पेन्शन सेवापत्र, पेन्शन धारकांसाठी [email protected] असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. या अदालतीच्या माध्यमातून पेन्शन धारकांना या उपक्रमांची माहिती देण्यात येणार असल्याचेही वरिष्ठ कोषागार अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.