नाशिक – अखिल भारतीय बाल रोग तज्ञ संघटनेच्या संघटनेची अलिबाग (जिल्हा रायगड ) येथे नुकतीच वार्षिक राज्यस्तरीय परिषद संपन्न झाली. या परिषदेत राज्यभरातून आलेल्या विविध बाल तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी ४२ वेगवेगळे अहवाल सादर केले. यामध्ये नाशिक शाखेने चमकदार कामगिरी करत तीन पारितोषिके पटकाविली.
वार्षिक राज्यस्तरीय परिषदेत नाशिक शाखेने ‘जागतिक स्तनपान सप्ताह ‘ या गटात विजेतेपद तसेच ‘जागतिक बाल जल क्षार संजीवनी सप्ताह ‘ आणि ‘ वार्षिक क्रिया कल्प अहवाल ‘ या गटांमध्ये उपविजेतेपद पटकाविले. या राज्यस्तरीय परिषदेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. जयंत पांढरीकर, सचिव डॉ. सदाचार उजलंबकर आणि डॉ. अमोल पवार यांच्या हस्ते सर्व विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सोनवणे, सचिव डॉ. रिना राठी, सहसचिव डॉ. अक्षय पाटील, खजिनदार डॉ. गौरव नेरकर यांनी पारितोषिक स्वीकारले. याप्रसंगी डॉ. रमाकांत पाटील, डॉ. केदार मालवतकर, डॉ. श्याम चौधरी, डॉ. चंद्रकांत सुरवसे, डॉ. पंकज गाजरे, डॉ. अनिल कासलीवाल, डॉ. विकास महाजन, डॉ. सागर सोनवणे, डॉ. विकास नाठे, डॉ. सुलभा पवार, डॉ. साधना पाटील, डॉ. मोहन वारके आदींसह मान्यवर उपस्थित होते.
नाशिक शाखेच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. जे. एस. पटेल, डॉ. एस. एस. कश्यपे, डॉ. प्रवीण भांब्री, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. मिलिंद भराडिया, डॉ. संगीता बाफना आदींनी गौरव केला. नाशिक शाखेच्या वतीने वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य व्यवस्थापक दत्ता केदार आणि कार्यालयीन सहाय्यक शिवा दरगुडे यांचे सहकार्य लाभले.