नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या., नाशिकच्या पंचवार्षिक निवडणूक (सन २०२३-२०२८) करीता निवडणूक बिनविरोध पार पडली. नूतन पदाधिकारी निवडीची संचालक मंडळाची सभा नाशिक जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन गोविंद नगर येथे झाली. यात नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
अध्यासी अधिकारी मा.श्रीमती छाया राजभोज यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. सभेत सर्वांच्या संमतीने डॉ.सुनील उत्तमराव ढिकले यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आले व त्यास सर्व संचालकांनी पाठींबा दिला. त्यामुळे अध्यक्षपदी डॉ.सुनील ढिकले यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्ष म्हणून भारत कोठावदे, कार्याध्यक्ष म्हणुन नारायण केरुजी वाजे व जनसंपर्क संचालिका म्हणून अश्विनीताई बोरस्ते यांची बिनविरोध निवड झाली असे अध्यासी अधिकारी यांनी सभेत जाहीर केले.
त्यावेळी फेडरेशनचे संचालक के.के.आण्णा चव्हाण, सुनील केदार, शिवाजी पगार, अशोक शिरोडे, राकेश चव्हाण,शशांक सोनी, दीपक महाजन, बापुसाहेब गायकवाड, अविनाश कोठावदे, महेश काबरा, राहुल कोतवाल, जी.एम.गायकवाड, तानाजी घुगे, संचालिका डॉ.शशीताई अहिरे, अंजलीताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सोपान थोरात अदि उपस्थित होते. डॉ.सुनील उत्तमराव ढिकले हे सध्या मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष म्हणून देखील कामकाज पाहत आहेत. सर्वांनी नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले व सर्वांनी त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नवी कार्यकारिणी अशी
अध्यक्ष – डॉ. सुनील ढिकले
उपाध्यक्ष – भारत कोठावदे
कार्याध्यक्ष – नारायण केरुजी वाजे
जनसंपर्क संचालिका – अश्विनीताई बोरस्ते