नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमृत भारत रथ औरंगाबादमार्गे नाशिकला पंचवटीत लक्ष्मीनारायण मंदिर येथे दाखल झाला. काळाराम मंदिर, सरदार चौक, रामकुंड, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, बालाजी संस्थान, तेली गल्लीपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.
अरुणाचल प्रदेशात असलेल्या सीमारेषेवर भगवान परशुराम कुंड या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात येणार असून, ५१ फूट उंचीची भगवान परशुरामाची पंचधातूची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. भारत सरकार , अरुणाचल प्रदेश सरकार यांचेकडून या परिसराचा कायाकल्प, संरक्षण , संवर्धन याचे कार्य होत आहे. परशुराम कुंड आमंत्रण यात्रेच्या प्रचारासाठी अमृत भारत रथ संपूर्ण देशभरात फिरवण्यात येत आहे. अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंड या ठिकाणी होणारे दि १२ ते १६ जानेवारी दरम्यान होणारे विशेष मेळाव्यासाठी आमंत्रण देण्यासाठी विप्र फाउंडेशन यांनी आमंत्रण यात्रेचे आयोजन केले आहे व पिवळ्या केशरी रंगाने सुशोभित केलेल्या अक्षदा देऊन येण्याचे आमंत्रण दिले जात आहे. पुज्य स्वामी चिरंजीवी श्री रामनारायण दास जी यांचे समर्थ नेतृत्व व मार्गदर्शन या आमंत्रण यात्रेस लाभलेले आहे .
मंगळवारी (दि. २२) सायंकाळी रथयात्रेचे पंचवटीत आगमन झाले. नाशिककर भाविकांनी यात्रेचे काळाराम मंदिर येथे जोरदार स्वागत केले. भगवान परशुराम च्या नावाची घोषणा देत महिलांनी मंगल कलश घेऊन, वाजत गाजत ही रथयात्रा रामकुंड इथे संत महंत, पुरोहित संघाच्या वतीने गंगा-गोदावरी आरती करण्यात आली. बालाजी संस्थान सकलपंच छन्यात ब्राह्मण नाशिक यांच्या वतीने सत्कार समारंभ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. संस्थचे अध्यक्ष हितेंद्र शर्मा, विश्वस्त आणि पदाधिकारी यांचे कडुन भगवान परशुराम कुंड येथे स्थापन होणार्या ५१ फुट उंच मुर्ती साठी देणगी राशीचा चेक विप्र फाउंडेशन चे कोषाध्यक्ष CA आर. बी. शर्मा यांना देण्यात आला. तसेच विप्र फाउंडेशन च्या वतीने नाशिक मध्ये काही नियुक्ती पत्र देण्यात आले निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
संपूर्ण देशासाठी गौरवास्पद असलेल्या पवित्र कार्याचे महातीर्थावर येण्याचे आमंत्रण देण्यासाठी कांची कामकोटी येथून जयपूरपर्यंत, जगद्गुरू श्री शंकराचार्य यांचे आशीर्वाद घेऊन आली. भगवान परशुराम कुंड आमंत्रण यात्रा अमृत भारत रथयात्रेला (दि. ८) पासून सुरुवात झाली आहे आणि जानेवारी महिन्यात जयपूरला समारोप होणार आहे.
पंचवटी कारंजा येथे परशुराम मंडळ तसेच आमंत्रण कुंड यात्रेचे आगमन झाल्यानंतर भाजप तपोवन मंडलतर्फे भगवान परशुराम आमंत्रण यात्रेचे स्वागत केले.
यात्रेत विप्र फाउंडेशन, स. प. छ. बालाजी संस्थान, अखिल भारतीय मध्यवर्ती ब्राह्मण, बहुभाषिक ब्राह्मण महासंघ, पुरोहित संघ, हिंदू धर्म प्रेमी संस्था, धर्माचार्य, साधुसंत आणि परशुराम भक्त, आद्यगौड समाज, दाधिच प्रगती मंडळ, पारिक समाज, महर्षि गौतम गुर्जरगौड ब्राह्मण समाज, सारस्वत ब्राम्हण समाज, खंडेलवाल समाज बांधव तसेच मुख्य महंत चिरंजीवी स्वामी रामनारायण दास, आर. बी. शर्मा, माधव शर्मा, अजित गौड, उमेंद्र दाधिच परशुराम कुंड यात्रेबरोबर सहभागी आहेत.
Nashik Parshuram Kund Amantran Yatra Welcome