नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटीत झेंडा लावण्यावरून चक्क दोन गटात दंगल उसळल्याची घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. मोठी गर्दी जमल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल होऊन दंगल आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करू लागतात. क्षणार्धात दंगल आटोक्यात आणतात. नंतर समजले की, दंगल नव्हती तर आगामी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी केलेले मॉकड्रील होते. धांदल उडालेल्या सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला…
19 फेब्रुवारीला शिवजयंती व आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी येथे दंगा नियंत्रण योजनेअंतर्गत दंगा नियंत्रणाचा सराव करण्यात आला. अचानक या पोलीस फौज फाट्याला पाहून येथील जनता थोड्या वेळासाठी भयभीत झाली होती. नंतर त्यांना मॉकडील सराव असल्याचे समजतात जीव भांड्यात पडला. सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावित यांनी नियंत्रण कक्षामार्फत पंचवटी अंतर्गत सर्व पोलीस स्टेशनला संदेश पाठवला. पंचवटी येथे दोन गटात झेंडा लावण्यावरून वाद चालु आहे. ते कळल्यानंतर चार ते पाच मिनिटात पंचवटी पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले त्यामुळे प मधुकर गावित यांनी समाधान व्यक्त केले.
ते म्हणाले आगामी शिवजयंती व मनपा निवडणूतिच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज राहावी अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत काय साहित्य सोबत असावे यासाठी सराव होता. तो अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला. येथील कमलनगर हिरावाडी या संवेदनशील भागात हे मॉकड्रील पार पडले. ७ पोलीस अधिकारी, ३६ अंमलदार आणि ९ मोठी वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. सर्व माझे अधिकारी डॉ. सिताराम कोल्हे , इरफान शेख, अशोक साखरे व त्यांचे सर्व सहकारी वेळेवर व योग्य साहित्य घेऊन चार ते पाच मिनिटात हजर झाले. यामुळे पोलिस यंत्रणा सज्ज असल्याची खात्री झाली.