गणेश वाजे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक-पेठ महामार्गाचे काँक्रिटी पूर्ण झाले आहे. ५३. ५१५ कि.मी अंतराचा रस्ता तयार झाल्याने आता या महामार्गावर टोल साकारण्यात आला आहे. पेठ महामार्गावर चाचडगाव येथील टोल नाक्यावर येत्या २२ जूनपासून वसुली सुरू होत आहे. टोलच्या २० कि.मी परिघातील नागरिकांना सदरील टोल फी मध्ये सवलतीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) आणि आधार कार्ड टोल प्लाझावर सादर करावे लागणार आहे. त्यानंतर वाहन स्थानिक श्रेणीमध्ये नोंदले जाणार आहे.
कार आणि जीपसाठी ४५ रुपये आकारले जाणार आहेत. विशेष म्हणजे, कार, जीप सारख्या छोट्या वाहनांना मासिक पास उपलब्ध करुन दिला जाणार आहे. स्थानिक नागरिकांना केवळ २० रुपयांचा टोल द्यावा लागणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे.
टोलचे दर खालीलप्रमाणे