नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठ तालुक्याती एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या भुवन येथील आश्रमशाळेतील वसतीगृहात अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, वसतीगृहाच्या अधिक्षकानेच हा अत्याचार केला आहे. याप्रकरणी पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अधिक्षक फरार आहे. याप्रकरणाची गंभीर दखल आदिवासी विकास विभागाने घेतली आहे. त्यामुळे दोन अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुवन येथे शासकीय आश्रमशाळा आहे. याच आश्रमशाळेत विद्यार्थिनींसाठी वसतीगृह सुद्ध आहे. निवासी असलेल्या या शाळेत अनेक विद्यार्थीनी शिक्षण घेतात. याच आश्रमशाळेतील इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाले आहेत.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वार्षिक परिक्षा संपली. त्याच दिवशी मुलांच्या वसतीगृहाचे अधीक्षक राहुल सुरेश तायडे याने मुलींच्या वसतीगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर या विद्यार्थिनीला बोलावले. आणि तेथे त्याने विद्यार्थिनीवर बलात्कार केला. आश्रमशाळेला सुट्या लागल्याने पिडीतेची आई तिला घेण्यासाठी आश्रमशाळेत आली. यावेळी पिडीतेने आपल्या आईला सर्व माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसात धाव घेत तक्रार केली.
याप्रकरणी पेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अदिवासी विकास विभागाने नेमलेल्या सहा महिला सदस्सीय विशाखा समितीने भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर या समितीने दिलेल्या अहवालानुसार अधीक्षक राहुल तायडे आणि महिला अधीक्षक प्रियंका उके हे दोषी आढळले आहेत. या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Nashik Paint Crime Trible School minor Girl Student Rape