गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक पदवीधर निवडणूक : मतदारांना मिळणार विशेष रजा

by India Darpan
जानेवारी 28, 2023 | 2:59 pm
in स्थानिक बातम्या
0
voting voter election e1706552559136

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी ३० जानेवारी, २०२३ रोजी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे, असे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी कळविले आहे. नाशिक पदवीधर मतदार संघासाठी ३० जानेवारी,२०२३ रोजी सकाळी ८.०० ते दु. ४.०० या वेळेत मतदान होणार आहे.

विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे
नाशिक विभागातील मतदान केंद्रांचीही संख्या जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्वाधिक मतदान केंद्र अहमदनगर जिल्ह्यात असून, तेथील मतदान केंद्रांची संख्या १४७ इतकी आहे. नाशिकमध्ये ९९, जळगाव जिल्ह्यात ४०, धुळ्यात २९ आणि नंदूरबार जिल्ह्यात २३ मतदान केंद्रे आहेत. विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे आहेत.

पदवीधर मतदारांना आपले नाव शोधणे होणार सुलभ
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ विधान परिषद निवडणूक-२०२३ चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. यासाठी ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. मतदारांना त्यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रास जोडलेले आहे, याबाबत शोध घेणे सुलभ होण्यासाठी मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/ ही लिंक दिली आहे. या लिंक द्वारे मतदारांना आपले नाव शोधणे सुलभ होणार आहे.

मतदानाच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी मतदानाच्या दिवशी म्हणजे ३० जानेवारी २०२३ रोजी मद्यविक्री करण्यास मनाई तथा कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२३ रोजी आदेश पारित केले आहेत. यादिवशी मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर बंधनकारक असणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विषारी औषध सेवन करून २८ वर्षीय विवाहीतेची आत्महत्या

Next Post

गावठी कट्टा घेवून फिरणा-या तरुणांवर पोलिसांची कारवाई; ३० हजार रूपये किमतीचे पिस्तूल हस्तगत

India Darpan

Next Post
crime 1234

गावठी कट्टा घेवून फिरणा-या तरुणांवर पोलिसांची कारवाई; ३० हजार रूपये किमतीचे पिस्तूल हस्तगत

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011