नाशिक – महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये झालेली ऑक्सिजन गळती आणि त्यामुळे २२ रुग्ण दगावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वायूगळतीस हलगर्जीपणा कारणीभूत असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एफआयआर मध्ये म्हटले आहे. याप्रकरणी राज्य सरकारने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून त्याचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे. तूर्त भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.