नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ताजा भाजीपाला.. ताजी फळे… सेंद्रीय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला… अशी वैशिष्ट्ये असलेले ऑरगॅनिक फार्मर्स मार्केट सध्या नाशकात प्रसिद्ध आहे. ग्राहकांचा त्याला मोठा प्रतिसाद लाभत आहे. तर, शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फायदा होत आहे. ही संकल्पना नेमकी काय आहे, कशी सुरू झाली, यापुढेही या मार्केटचे स्वरुप कसे असेल याविषयी आज आपण इंडिया दर्पण फेसबुकमध्ये लाईव्हमध्ये ऑरगॅनिक फार्मर्स मार्केटचे समन्वयक हेमंत उपासनी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांची विशेष मुलाखत उत्तरा तिडके यांनी घेतली आहे.
ऑरगॅनिक फार्मर्स मार्केटची कल्पना आदर्श क्लासेसचे संचालक प्रभाकर मोराणकर यांची, त्यांच्या या संकल्पेनाला पुढे नेण्याचे काम हेमंत उपासनी करत आहेत. त्यांनी या मुलाखतीत मोरणकर यांना ऑरगॅनिक फार्मस मार्केट कल्पना कशी सुचली याबद्दल माहिती देतांना सरांचे इतर कामाबद्दलही सांगितले. यावेळी त्यांनी ऑरगॅनिक फार्मस मार्केट केव्हा व कुठे भरतो, त्याची वेळ काय असते, या सेंद्रिय शेती उत्पादनाचा भाव हा बाहेरच्या मार्केटच्या तुलनेने बराच जास्त असतो याबद्दलही माहिती दिली. त्याचबरोबर या मार्केटमध्ये भाजीपाला फळे यांचे व्यतिरिक्त मिळणारे धान्य कडधान्य, दूध, तूप तेल याबद्दलही सविस्तर सांगितले. त्याचबरोबर मार्केटला आतापर्यंत कसा प्रतिसाद मिळाला याबद्दलही त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.. बाराही महिने आपल्याकडे ताजा भाजीपाला, ताजी फळे आपल्याला मिळतो.. पण आज शेतीत रासायनिक खते कीटकनाशके यांचा इतका वापर केला जातो की या ताज्या हिरव्यागार भाज्या म्हणून आपण विषच खात असतो. त्याचा खूप अनिष्ट परिणाम आपल्याला प्रकृतीवर होत असतो. त्यामुळेच सेंद्रीय पद्धतीने, कोणतेही रासायनिक खत, कीटकनाशक न वापरता फळ व भाजीपाला नागरिकांना मिळावा यासाठी सेंद्रीय शेती ही संकल्पना आता जोर धरु लागली आहे. या मुलाखतीत त्याबद्दलही सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओमध्ये……
Nashik Organic Farmers Market Interview
India Darpan Facebook Live