ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओझर व पिंपळगाव पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे ओझर मध्ये केलेल्या धडक कारवाई मध्ये ७८ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. ओझर येतील कत्तल खाण्यावर रात्री उशिरा छापा मारून या गोवंश वाचवण्यात आले. ही गोवंश अतिशय निर्दयीपणे बांधून ठेवलेले आढळून आले. ही सर्व गोवंश पिंपळगाव बसवंत येथील गोशाळेत पाठवण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरा पर्यंत दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आले.
या कारवाईबाबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमापयांनी नाशिक ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व विशेष पथकास दिलेले आहे. सदर आदेशानुसार ओझर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दुर्गेश एम तिवारी व पिपंळगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी अशोक पवार यांनी मिळालेल्या गुप्तबातमी नुसार ही कारवाई करण्यात आली.
ओझर गावातील केजीएन कॉलनीलगत शेटे मळा जवळ ही कारवाई केली. १) नंदु जयराम गांगोडे (वय ३९ वर्ष रा.ननाशी ता. दिंडोरी हल्ली एकबाल अत्तार के जी एन कॉलनी शेटे मळा जवळ ओझर ता.निफाड) २) विजय नंदु गांगोडे (वय १८ वर्ष रा.ननाशी ता.दिंडोरी हल्ली एकबाल अत्तार के जी एन कॉलनी शेटे मळ्याजवळ ओझर ता.निफाड) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनी एकबाल अत्तार व कादीर अत्तार यांच्या शेतात शाहरुख रशीद शेख, अकबर बाबु शेख, खलील शेख कुरेशी यांचे सांगणेवरुन गोवंश व म्हैसवर्गीय जनावरे कत्तलीसाठी शेताच्या कंपाउंडच्या तारांना बांधुन त्याना क्रुर वागनुक देवुन सदरची गोवंश व म्हैसवर्गीय जनावरे ही आलीम ईस्माईल कुरेशी जुनेद आलीम शेख यांच्या मालकीच्या बंगल्यात पत्र्याचे शेडमध्ये कत्तलीसाठी नेऊन महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी असतांना देखील संगनमत करुन सर्व साथीदारांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सदरची गोवंश जनावरे कत्तलीसाठी जवळ बाळगली. व त्यांनी अवैध नसलेली कृती अवैध साधनानिशी करण्याचे किंवा करविण्याचे एकमेकामध्ये संगनमत करुन फौजदारी पात्र कटकारस्थान केले.
यांच्यावर झाली कारवाई
पोलीस शिपाई जितेंद्र बागुल यांनी १) नंदु जयराम गांगोडे वय-३९ वर्ष रा.ननाशी ता.दिंडोरी हल्ली एकबाल अत्तार के जी एन कॉलनी शेटे मळा जवळ ओझर ता.निफाड २) विजय नंदु गांगोडे वय- १८ वर्ष रा.ननाशी ता.दिंडोरी हल्ली एकबाल अत्तार के जी एन कॉलनी शेटे मळा जवळ ओझर ता.निफाड ३) शाहरुख रशीद शेख ४)अकबर बाबु शेख ,५) खलील शेख कुरेशी ६) आलीम ईस्माईल कुरेशी ७) जुनेद आलीम शेख ८) एकबाल अत्तार ९) कादीर अत्तार सर्व रा.ओझर ता.निफाड यांचेविरुद्ध भा.दं.वि.कलम १०७, १२० (ब), ३४ प्रमाणे फिर्याद दिली आहे. सदर कार्यवाही मध्ये ७३ गोवंश जनावरे ५ म्हैस वर्गीय जणावरे असा एकुण ६,४२,९०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी हे करीत आहेत.
या पथकाची कामगिरी
सदरची कामगिरी शहाजी उमाप पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, श्रीमती माधुरी केदार –कांगणे ,सुनिल भामरे उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, सहा.पो.उप निरी.जोशी, पोहवा विश्वनाथ धारबळे, पो.ना दिपक गुंजाळ पो ना बागुल पो.शि.प्रसाद सुर्यवंशी ,पो.शि राजेंद्र डंबाळे ओझर पोलीस स्टेशन व पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार व पिंपळगाव ब.पोलीस स्टेशन कडील पो.ना. दिपक निकुंभ ,पो.ना. सुनिल पगारे ,पो.ना. रविंद्र गुंजाळ यांच्या पथकाने केली.