नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकसह उत्तर महाराष्ट्र हा लाचखोरीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. प्रशासनात बोकाळलेल्या लाचखोरीमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे १ जानेवारीपासून १० जुलै पर्यंत १०० सापळे यशस्वी ठरले आहेत. या सर्व कारवाईत आतापर्यंत १४५ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये लाचखोरीचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळेच या पाचही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लाचखोर सापडत आहेत. खासकरुन नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सापळे यशस्वी झाले आहेत. तशी माहिती एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी दिली आहे.
लाच देणे आणि घेणे गुन्हा असला तरी दिवसेंदिवस लाचखोर एसीबीमुळे समोर येत आहेत. १ जानेवारीपासून आतापर्यंत १४५ लाचखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात क्लास वन अधिकाऱ्यांपासून खासगी एजंटांचा समावेश आहे. अधिक आकडेवारी अशी
क्लास वन अधिकारी – ७
क्लास टू अधिकारी – १७
क्लास थ्री कर्मचारी – ७८
क्लास फोर कर्मचारी – ९
कंत्राटी कर्मचारी – ११
खासगी एजंट – २३