नाशिक – कोरोना प्रतिबंधक लसीकरण सध्या सुरू आहे. सद्यस्थितीत १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सध्या बंद आहे. केवळ ४५ वर्षे वयोगटापुढील लसीकरण सुरू आहे. त्यातच ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांना प्राधान्य दिले जात आहे. रविवारच्या (३० मे) लसीकरणाबाबत नाशिक महापालिकने महत्त्वाची माहिती दिली आहे. रविवारी शहरातील कुठल्याही लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून शहरात रविवारचे लसीकरण बंद आहे. लसीचा अपुरा पुरवठा हे त्यामागील मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.