हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते व फूटपाथ मोकळे ठेवण्यासाठी सातत्याने अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविण्यात येत आहे. आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, तसेच उपायुक्त सुवर्णा दाखणे, उपायुक्त (अतिक्रमण) संगीता नांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित सहा विभागीय अधिकारी व अतिक्रमण निर्मूलन पथके काटेकोर अंमलबजावणी करीत आहेत. नागरिकांनी स्वखुशीने अतिक्रमण हटवावे, अन्यथा कार्यवाहीला सामोरे जावे लागेल असा इशारा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी दिला आहे. तर, आयुक्त मनीषा खत्री, स्वतः महिमेत सहभागी झाल्यामुळे व उपायुक्त सुवर्णा दाखणे, संगीता नांदूरकर व मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या तीन दिवसांत महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा पुढीलप्रमाणे
दि. 09/10/2025 रोजी
भाजीपाला/फळ विक्रेते – 68 हटवले
निष्कासित अतिक्रमण – 43
होर्डिंग/बॅनर – 44
एकूण कारवाई : 155
दि. 10/10/2025 रोजी
अनधिकृत भाजीपाला विक्रेते – 46 हटवले
निष्कासित अतिक्रमण – 53
होर्डिंग/बॅनर/फ्लेक्स – 41
एकूण कारवाई : 140
दि. 11/10/2025 रोजी
(वडाळा नाका ते वडाळा गाव चौफुली परिसरात)
शेड – 82 निष्कासित
टप-या – 11 हटविण्यात
ओटे – 29 तोडण्यात
होर्डिंग – 30 काढण्यात
एकूण कारवाई : 152
12 ऑक्टोबर रोजी
पेठ रोड व रामवाडी येथील कमानीवरील 12होर्डिंग हटविण्यात आली.
🔹 तीन दिवसांत झालेली एकत्रित कारवाई – एकूण 459 अतिक्रमणांवर कार्यवाही
या मोहिमेअंतर्गत रस्त्यांवरील फळ-भाजी विक्रेते, अनधिकृत ओटे, टप-या, होर्डिंग व बॅनर्स काढून टाकण्यात आले असून नागरिकांच्या सोयीसाठी फूटपाथ व सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यात आल्या आहेत.
मनपाच्या वतीने नागरिकांना स्पष्ट आवाहन केले आहे की,
“आपल्याकडून केलेली अतिक्रमणे स्वतःहून तात्काळ हटवा. अन्यथा महानगरपालिका प्रशासनाकडून सक्त कारवाई करण्यात येईल आणि त्यासाठी कोणीही सूट देण्यात येणार नाही. नागरिकांनी सहकार्य करून शहर स्वच्छ, सुंदर व अतिक्रमणमुक्त ठेवावे.”
या प्रभावी मोहिमेमुळे नागरिक व सामाजिक संस्थांकडून आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, उपायुक्त संगीता नांदूरकर तसेच सहा विभागीय अधिकारी व अतिक्रमण विभागाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नागरिकांनी शहरातील शिस्तबद्धता, स्वच्छता आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाच्या कार्यवाहीचे स्वागत केले आहे.
महानगरपालिकेने नागरिक, व्यापारी आणि विक्रेत्यांना आवाहन केले आहे की त्यांनी नियमांचे पालन करून अतिक्रमण न करता शहर सुबक व सुरक्षित ठेवण्यास सहकार्य करावे.
नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध सातत्याने कठोर व कायदेशीर कारवाई सुरू राहील, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
या मोहिमेत समन्वय करणारे अधिकारी:
पंचवटी विभाग – मदन हरिश्चंद्र
नाशिक पूर्व विभाग – राजाराम जाधव
नाशिक पश्चिम विभाग – चंदन घुगे
सातपूर विभाग – राजाराम जाधव
नवीन नाशिक विभाग –जयश्री बैरागी
नाशिकरोड विभाग – डॉ.प्रज्ञा त्रिभुवन
या सर्व विभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यामुळे शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला वेग प्राप्त झाला असून नागरिकांकडूनही या कार्यवाहीचे स्वागत होत आहे.