नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तब्बल अडीच वर्षांपासून बंद असलेले फाळके स्मारक आज पासून सुरू करण्यात आले आहे. उद्याने विकसित करणे, साफसफाई, रंगरंगोटी, कारंजे सुरू करणे, धबधबा सुरु करणे, सुरक्षा व्यवस्था पुरविणे इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत. Auditorium, exhibition hall, restaurant, water park चालू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. निविदा प्रक्रिया राबवून फिल्म सिटीच्या धर्तीवर फाळके स्मारकाचा विकास करण्यात येणार आहे. तूर्तास १ जुलै २०२२ पर्यंत सर्वांना विनामूल्य प्रवेश राहणार आहे. त्यानंतर मात्र पूर्वीप्रमाणेच दर आकारण्यात येणार आहेत. आज महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी अधिकाऱ्यां समवेत फाळके स्मारक व परिसराची पाहणी केली. तसेच, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे निर्देश दिले.