नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही वर्षापासून नाशिक शहराची लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. त्यानुसार दरवर्षी श्री गणेशाची प्रतिष्ठापना मोठया प्रमाणात दिसून येत आहे. कला, संस्कृती, परंपरा आणि एकोपा याचं प्रतिक म्हणून श्रीगणेशोत्सवाकडे पाहीले जाते. सन 2022 श्री गणेशोत्सव हा पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा व्हावा अशी नाशिक महानगरपालिकेची धारणा आहे. त्यामुळेच नाशिक महापालिकेकडून समस्त गणेश भक्तांना जाहीर आवाहन करण्यात येते की, प्रदुषण टाळा आणि पर्यावरण पूरक गणपती उत्सव साजरा करा.
नाशिक महापालिकेने आवाहन केले आहे की, पी.ओ.पी.च्या श्री गणेश मुर्तींचा वापर टाळा व त्याऐवजी शाडु मातीच्या श्री गणेश मुर्तींचा वापर करा. पी.ओ.पी.ची श्री गणेश मुर्ती आणलीच, तर तिचे अमोनियम बायोकार्बोनेटच्या मिश्रणामध्ये घरच्या घरी विसर्जन करा.
अमोनियम बायोकार्बोनेट पावडर ही नाशिक महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयात “विनामूल्य” उपलब्ध असुन आपण खालील दर्शविलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधुन श्री गणेश विसर्जनाकरीता अमोनियम बायकार्बोनेट पावडर उपलब्ध करुन घेऊन श्री गणेश विर्सजन कार्यपध्दती जाणून घ्यावी. निर्माल्य नदीमध्ये न टाकता निर्माल्य कलशाचा उपयोग करा व नदीचे प्रदुषण टाळा. तसेच थर्माकॉल व प्लॉस्टिकचा वापर टाळा असे आवाहन नागरीकांना मनपातर्फे करण्यात येत आहे.
विनामूल्य अमोनियम बायकार्बोनेट पावडरसाठी येथे साधा संपर्क
नाशिक पुर्व विभाग – श्री.सुनिल शिरसाट – विभागीय स्वच्छता निरीक्षक – 9423179173
नाशिक पश्चिम विभाग – श्री.संजय गोसावी – विभागीय स्वच्छता निरीक्षक – 9423179176
पंचवटी विभाग – श्री.संजय दराडे – विभागीय स्वच्छता निरीक्षक – 9763257778
नविन नाशिक विभाग – श्री.संजय कोंडाजी गांगुर्डे – विभागीय स्वच्छता निरीक्षक – 9423179171
सातपुर विभाग – श्रीमती. माधुरी श्रीधर तांबे – विभागीय स्वच्छता निरीक्षक – 8983159056
नाशिक रोड विभाग – श्री. अशोक साळवे – विभागीय स्वच्छता निरीक्षक – 9423179172
Nashik NMC Ammonium Bicarbonate Powder
Ganesh Festival