नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल जलद गतीने देश विदेशात पोहोचविता यावा यासाठी निफाड येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे प्रस्तावित आहे. मागील काही दिवसांपूर्वी या प्रकल्पासाठी राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनी बरोबर काम करण्यासाठी जेएनपीटीने सकारात्मकता दर्शविली होती.त्यामुळे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क या प्रकल्पाचा विषय मार्गी लागण्याच्या कामाला गती मिळाली होती.मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्याच्या कामाचा डीपी तयार करण्याकामी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागवण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतीमाल मोठ्या प्रमाणावर उत्पादित होत असतो. उत्पादित शेतीमाल विक्रीसाठी जलद गतीने देश,विदेशात पोहोचविता यावा यासाठी जिल्ह्यात ड्रायपोर्ट उभारण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी प्रस्तावित असलेली निफाड कारखाना येथील जागेवर विविध कर आणि थकित कर्ज असल्याने या जागेवर प्रकल्प होणे अवघड वाटत होते. त्यामुळे खा.गोडसे यांनी पुढाकार घेत सदर प्रकल्पासाठी नियोजित जागेवर काही अडचणी येत असल्यास प्रकल्प जिल्हाबाहेर जाऊ नये म्हणून शिलापूर आणि मुंडेगाव येथील जागा सुचविल्या होत्या.परंतु राज्यात आयसीडी (लोड कंटेनर डेपो )खूप असल्याने नवीन आयसीडी प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र वरील झोड मध्ये मोडत असल्याने गेल्या काही वर्षांपासून ड्रायपोर्ट प्रकल्पित होता.
या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनी पुढे सरसावली होते. मल्टी मॉडल औद्योगिक पार्कने ठरवले तर आयसीडीमधून नाशिकला वगळण्याची परवानगी राज्याकडून मिळवू शकतात. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट ही नॅशनल हायवेची कंपनी असून काही दिवसांपूर्वी या कंपनीने जेएनपीटीला पत्र लिहित आपण सोबत काम करून नासिक येथे ड्रायपोर्ट उभारू यात का,अशी विनंती केली होती. कंपनीच्या प्रस्तावास जेएनपीटीने सहमती दर्शविली होती. त्यामुळे निफाड येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा मार्ग सुखर झाला होता.
हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीने नुकतेच निफाड येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्याच्या कामाचा डीपीआर तयार करण्याकामी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्याचे पत्र काढले आहे. यामुळे लवकरच मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारणीचा विषय आता कायमचाच मार्गी लागणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.
Nashik Niphad Multi Logistic Park Tender