निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील करंजगाव-सायखेडा परिसरात एक गंभीर घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांच्या कुटुंबामध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विशेष म्हणजे मारहाणीचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. त्यात दिसते आहे की दोन्ही कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू आहे. याप्रकरणी तक्रार केली असता सायखेडा पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे जखमी भावाने म्हटले आहे. आता सोशल मिडियात हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोठ्या भावाने त्याच्या दोन मुलांच्या मदतीने सख्ख्या भावाला आणि त्यांच्या कुटुंबातील बायको व मुलीला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
Nashik Niphad Crime Brother Fight Police