निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी निफाड तालुक्यातील दावचवाडी येथील तलाठी महेश सहदेव गायकवाड पाच हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडले गेले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत ही कारवाई केली. गायकवाड यांच्याकडे चितेगावच्या तलाठीचाही अतिरिक्त कार्यभार होता.
तक्रारदार यांची आत्या हिने तक्रारदार तसेच त्यांचे वडील यांच्या नावे मौजे नागापूर येथील गट नंबर ३३७ अन्वये एक हेक्टर तीन आर तसेच गट नंबर ३३९ अन्वये एक हेक्टर पाच आर अशी शेती मृत्युपत्र करून लिहून दिली होती. याची दस्तनोंदणी त्यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडे केली. त्यानंतर तलाठी गायकवाड यांच्याकडे सातबारा उताऱ्यावर नोंदणीसाठी अर्ज केला. या कामासाठी गायकवाड यांनी लाचेची मागणी करून लाचेची रक्कम पंच व साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली. या लाच प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई*
*युनिट -* ला.प्र.वि. नाशिक
*तक्रारदार-* पुरुष, ३२ वर्ष.
रा. चांदोरी, तालुका – निफाड, जिल्हा नाशिक
आलोसे* – महेश सहदेव गायकवाड, वय- ४३ वर्ष, धंदा- नोकरी , तलाठी दावचवाडी अतिरिक्त कार्यभार चितेगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक
*लाचेची मागणी-* ५०००/- रुपये दि. ०६/०३/२०२३
*लाच स्वीकारली* – ५०००/- रुपये दि. ०६/०३/२०२३
*लाचेचे कारण -*.
यातील तक्रारदार यांची आत्या हिने तक्रारदार तसेच त्यांचे वडील यांच्या नावे मौजे नागापूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील गट नंबर 337 अन्वये एक हेक्टर तीन आर तसेच गट नंबर 339 अन्वये एक हेक्टर पाच आर अशी शेती मृत्युपत्र करून लिहून दिली होती. सदर बाबत त्यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडे दस्त नोंदणी केला होता. त्या अनुषंगाने आलोसे यांच्याकडे केलेल्या अर्जाअन्वये तक्रारदार व त्यांचे वडील यांचे नाव सदरील जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद घेणे कामी आरोपी लोकसेवक याने लाचेची मागणी करून लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
*आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी :- मा. जिल्हाधिकारी, नाशिक
*सापळा अधिकारी – संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
*सापळा पथक*-
पो. हवा. एकनाथ बाविस्कर
पो. ना. प्रकाश महाजन
पो. शि. नितीन नेटारे
Nashik Niphad ACB Trap Bribe Corruption Crime