नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)तर्फे त्रंबकरोडवरील आयटीआय मैदानावर आयोजित निमा पॉवर 2023 हे चार दिवसांचे प्रदर्शन शुक्रवार दि.19 मेपासून जनतेला बघण्यास खुले होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादाजी भुसे,आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 9 वाजता संपन्न होणार आहे. 22 मेपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे.
भविष्याचा वेध घेणाऱ्या आणि इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यास सज्ज असलेल्या या प्रदर्शनाला जास्तीत जास्त लोकांनी भेट देऊन उद्योजकांचा आनंद द्विगुणित करावा,असे आवाहन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि प्रदर्शनाचे चेअरमन मिलिंद राजपूत यांनी केले.
इलेक्ट्रिकल,इलेक्ट्रॉनिक,इन्स्ट्रुमेशन,ऑटोमेशन या क्षेत्रातील उद्योजकांना प्रोत्साहन तसेच गुंतवणुकीला चालना मिळण्याच्या उद्देशाने 2013मध्ये निमातर्फे पहिले पॉवर एक्झिबिशन भरवून धनंजय बेळे यांनी सर्वांची मने जिंकली होती.त्याची फलश्रुती म्हणजे त्यानंतर सीपीआरए टेस्टिंग लॅबची गिफ्ट नाशिकला मिळाली. नंतर 2016मध्ये पॉवर एक्झिबिशन झाले.आता याच शृंखलेतील हे तिसरे प्रदर्शन आहे.
आतापर्यंतची सर्व प्रदर्शने धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखालीच यशस्वीपणे पार पडली आहेत. जिल्ह्यात निमाचे 4000हून अधिक सदस्य असून 16500 इंडस्ट्रीज आहेत. स्टार्टअप अंतर्गत उद्योजकांना उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याचे काम संघटना यशस्वीपणे करीत आहे.उद्योजकांची अद्ययावत अशी डिरेक्टरीही निमातर्फे दरवर्षी प्रकाशित केली जाते.
प्रदर्शन यशस्वीतेसाठी निमाचे सरचिटणीस राजेंद्र अहिरे,खजिनदार विरल ठक्कर,नितीन वागस्कर,शशांक मणेरीकर,प्रवीण वाबळे, किरण वाजे,दिलीप वाघ, कैलास पाटील, दिलीप वाघ, राहुल गांगुर्डे, जयंत पगार, कालिदास फडतरे, सुनील जाधव, संदीप भदाणे, जयंत जोगळेकर, रवींद्र झोपे, राजेंद्र वडनेरे, विराज गडकरी,हेमंत खोंड,वैभव जोशी,संजय सोनवणे,श्रीधर व्यवहारे,श्रीकांत पाटील,रवी शामदासानी,सतीश कोठारी , विजय जोशी,जयदीप राजपूत, मंगेश काठे,वेंकटेश मूर्ती,,विश्र्वास शिंपी, बाळासाहेब जाधव, किरण लोणे,वैभव चावक,विश्वास शिंपी,विजय कडवाने,आदी प्रयत्नशील आहेत
Nashik Nima Power Industrial Exhibition