रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तब्बल ७ वर्षांनी नाशकात होणार निमा पॉवर प्रदर्शन; इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला मिळणार चालना

एप्रिल 2, 2023 | 8:33 pm
in राज्य
0
IMG 20230402 WA0013

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक ज्याची दीर्घकाळापासून प्रतीक्षा करीत आहेत त्या *निमा पॉवर* एक्झिबिशनचे 19 ते 22 मे 2023 दरम्यान आयोजन करण्यात आले असून त्याच्या बोधचिन्ह तसेच माहिती पुस्तिकेचे अनावरण निमा हाऊस येथे सोमवारी (दि.3 एप्रिल) संपन्न होत आहे,अशी माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे,महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर आणि विद्युत निरीक्षक भागवत उगले उपस्थित राहणार आहेत.

निमातर्फे दहा वर्षा पूर्वी 2013 साली प्रथम आवृत्ती मध्ये निमा पावर हे प्रदर्शन घेण्यात आले होते, 2016 ला झालेल्या निमा पावर प्रदर्शनानंतर,मधल्या जवळपास चार ते पाच वर्षाच्या कालखंडानंतर प्रथमच इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स,इन्स्ट्रुमेंटेशन,ऑटोमेशन, मेकॅटॉनिक्स, अशा विशेष विषयांकित असलेले अशा प्रकारचे प्रदर्शन व B 2 B होत असल्याने या संबंधित तसेच इतरही सर्व उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांची व सर्वसामान्य नाशिककर नागरिकांची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे असे म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. 2013 मध्ये प्रथमच आयोजित केलेल्या निमा पॉवर मुळेच उत्तर महाराष्ट्राला एक आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले.

इलेक्ट्रिकल संबंधित उद्योगां साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली सीपीआरआयची टेस्टिंग लॅब नाशिकला या प्रदर्शनामुळेच मिळाली आणि नाशिककरांसाठी ही मोठी देणगीच म्हणावी लागेल.ऑटोमोबाईल हब बरोबरच, नाशिक हे इलेक्ट्रिकल हब म्हणूनही मोठ्या प्रमाणात महत्त्वपूर्ण असे हब आहे, इलेक्ट्रिक व त्या संबंधित विषयक 1000 हून अधिक कंपन्या नाशिकची शोभा वाढवित आहेत. त्यामुळेच निमा पॉवर -2023 एकप्रकारे औद्योगिक कुंभमेळाच ठरणार आहे.प्रदर्शनात विविध परदेशी गुंतवणूकदार, वेगवेगळ्या देशांचे कांस्युलेट जनरल व कमर्शियल ऑफिसर्स, विविध मल्टिनॅशनल कंपन्यांचे व इतरही नामवंत कंपन्यांचे सिओ, कमर्शियल उपाध्यक्ष, स्वतः मालक व वरिष्ठ अधिकारी तसेच प्रतिनिधीउपस्थित राहणार असून B2B मध्येही सहभागी होणार आहेत, या प्रदर्शनामुळे नाशिकच्या औद्योगिक तसेच नागरी अर्थचक्रासही गती मिळणार असल्याने सर्वानाच त्याची प्रतीक्षा असल्याचेही बेळे यांनी नमूद केले.

निमा पॉवर 23 च्या यशस्वीतेसाठी निमाचे मानद सचिव राजेंद्र अहिरे,उपाध्यक्ष किशोर राठी,आशिष नहार,खजिनदार विरल ठक्कर, सहसचिव हर्षद ब्राह्मणकर , निमा पावर कमिटी चेअरमन श्री मिलिंद राजपूत, कार्यकारणी सदस्य गोविंद झा,जयंत जोगळेकर,रवींद्र झोपे,राजेंद्र वडनेरे,वैभव जोशी, संजय सोनवणे, श्रीधर व्यवहारे ,नितीन वागस्कर,जितेंद्र आहेर,मनीष रावळ, श्रीकांत पाटील, एस.के.नायर,सुधीर बडगुजर,सुरेंद्र मिश्रा,सतीश कोठारी, दिलीप वाघ, हेमंत खोंड,रवी श्यामदासानी, विराज गडकरी, कैलास पाटील, शशांक मनेरिकर, संजय राठी, रावसाहेब रकिबे, विजय जोशी, व्यंकटेश मूर्ती, वैभव चावक, विश्वास शिंपी, पंडित ब्राह्मणकर, बाळासाहेब जाधव, आदी परिश्रम घेत आहेत. माहिती पुस्तकाचे अनावरण कार्यक्रमास उद्योजकांनी उपस्थित राहावे असे आवाहन निमा पावर कमिटी व निमा पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.

Nashik Nima Power Electrical and Electronics Industry

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एसयुव्ही कारमध्ये झाला हल्ला

Next Post

अंबानी कुटुंबाच्या चार पिढ्या आल्या एकत्र; हे होते निमित्त

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
IMG 20230402 WA0014 e1680448014330

अंबानी कुटुंबाच्या चार पिढ्या आल्या एकत्र; हे होते निमित्त

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011