नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निलगिरी बाग येथे खासगी डाळिंब मार्केट मध्ये असलेल्या गाळ्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत ७ ते ८ गाळ्यांमधील फ्रुट पॅकिंग साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांच्या मार्फत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
या ठिकाणी गाळ्यांचे शटर बंद असल्याने जेसीबीच्या साहाय्याने शटर तोडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. मोबाईलची बॅटरी चार्जिंग करताना स्फोट होऊन ही आग लागल्याचे बोलले जात आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठ्याप्रमाणात झाले आहे.
Nashik Nilgiri Bag Pomegranate Market Shop Fire