नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपले स्वप्न साकार करावयाचे असल्यास प्रयत्नाची पराकाष्टा करावीच लागते.. ज्यांच्याजवळ उमेद आहे ते कधीच हरू शकत नाही. नुकत्याच झालेल्या मिसेस अर्थ २०२३ सौंदर्य स्पर्धेत एलिट मिसेस इकोस्पियर रनर अप म्हणून मुकुट पटकावलेल्या नाशिकच्या नीलाक्षी लोहीने फिलिपिन्स मध्ये आपले मत व्यक्त केले
गेल्या वर्षी पुण्यात आयोजित मिसेस वेस्ट इंडिया एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया २०२२ सीजन चारच्या शानदार अंतिम फेरीमध्ये मिसेस वेस्ट इंडिया २०२२ सिल्वर गटात विजेती ठरलेल्या निलक्षीने एक नवा प्रवास सुरू केला. दिवा पेजेंट्सच्या राष्ट्रीय संचालिका अंजना मॅस्करेन्हस यांच्या मार्गदर्शनाखाली मंचासाठी तिने लक्ष केंद्रित केले आणि विजेती ठरली.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव कथन करताना नीलाक्षी इतर देशातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व असलेल्या अनेक सौंदर्यवतींना भेटताना व अनेकांच्या संस्कृतीची देवाण-घेवाण करताना भरपूर काही शिकायला मिळाले असेही त्यांनी सांगितले. या स्पर्धेत इको वेअर राऊंड, नॅशनल कॉस्ट्यूम राऊंड, इव्हिनिंग गाऊन राउंड, या प्रकारच्या अनेक फेऱ्यांमध्ये तिने विश्वासाने सहभाग घेतला व एकूण ४५ सौंदर्यतीमध्ये उपविजेती म्हणून तिच्या नावाची घोषणा करण्यात आली.
वाइल्डलाइफ फोटोग्राफीचा उत्कट छंद असलेल्या या गृहिणीसाठी प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होणे सोपे नव्हते. माझ्या स्टेज बद्दलच्या भीतीवर मात करणे ही माझी सर्वात मोठी उपलब्धी होती. अमरावतीची रहिवासी असलेल्या नीलाक्षीला स्वयंपाक आणि बेकिंग व्यतिरिक्त वायोलिन वाजवणे व वन्यजीव फोटोग्राफी करणे या गोष्टीची आवड आहे. तिच्या म्हणण्यानुसार फोटोग्राफी ही जगात सर्वत्र समजणारी एकमेव वैश्विक भाषा आहे.
खरंतर फोटोग्राफीच्या तिच्या आवडीमुळे शारीरिक फिटनेस उच्च दर्जाचे ठेवण्यास ती यशस्वी ठरली. या यशाचे श्रेय ती तिचे पती श्याम लोही, दिवा पेजेट चे संचालिका अंजना मस्केरेहनस व कार्ल मस्केरेहनस यांना देते. सतरा व बारा वर्षाच्या दोन तरुण मुलांची आई असलेली नीलाक्षी ही सर्व गृहिणींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी आशा आहे.
Nashik Nilakshi Lahi Elite Mistress Earth Ecosphere Philippines