नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या चार पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. तपास यंत्रणांनी देशभरात पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांवर छापे टाकले आहेत. मालेगाव आणि नाशिकमधील पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक न्यायालयाने या चौघांना ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.
मालेगाव येथील पीआयएफचा जिल्हाप्रमुख मौलाना सैफू रहमान आणि आणखी एकाला त्यावेळी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आणखी दोन संशयितांना चौकसीसाठी ताब्यात घेतले. हे आणखी दोघे कोण आहेत याचा अद्याप खुलासा झालेला नाही. महाराष्ट्र एटीएस आणि एनआयए यांच्या वतीने संयुक्तरित्या ही कारवाई सुरू आहे. महाराष्ट्रातून एकूण २० जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्व जणांचे दहशतवादाशी नेमके काय कनेक्शन आहे हे शोधण्याचे काम तपास यंत्रणांनी सुरु केले आहे.
Nashik NIA ATS PFI 4 Arrested Crime
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/