नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कर्मयोगीनगर, तिडकेनगर भागात महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या वतीने शनिवारी, ३१ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करण्यात आले.
नाशिकच्या प्रभाग क्रमांक २४ मधील कालिका पार्क, कर्मयोगीनगर, तसेच तिडकेनगर येथील महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांची साफसफाई करण्यात आली. याच ठिकाणी शनिवारी, ३१ ऑगस्ट रोजी शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. परिसर स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि रक्षणाचा संदेश देण्यात आला.
आंबा, आवळा, पारिजातक, जास्वंद, कडूलिंब, सोनचाफा, अर्जुन, बेल, मोहगनी, कदंब, कांचन आदी वृक्षांचा यात समावेश आहे. यावेळी शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, दिलीप रौंदळ, नितीन मराठे, मनोज अट्रावलकर, अरुण काळे, विश्वनाथ काळे, वैशाली मराठे, छाया चौधरी, स्मिता गाढवे, रोहिणी बागुल, मिनाक्षी जगताप, मेघमाला भदाणे, शुभांगी निकम, शुभांगी देशमुख, राहुल कदम, सचिन राणे, दत्तात्रय पाटकर, प्रकाश तांबट, मिलिंद घन, प्रकाश निकम, विशाल भदाणे, नंदु कुर्हाडे, सतिश मोरे, भरत जाधव, पंडित वाळके, जगन्नाथ चौधरी, सुरेश मुसळे, देवेंद्र कुकडे, अतुल जाधव, विजय भदाणे, विजय धुमाळ, शांतीलाल पवार, रुपाली गवळे, सरोज रसाळ, रुचा येवले, मंजिरी घन, संगीता पगार, सरला निकम, अर्चना कुर्हाडे, रत्ना तांबट, सुनंदा भंडारे, सरला पाटील, अर्चना पवार, संगीता रौंदळ, पंढरीनाथ पाटील, संदीप अमृतकर, संदीप सोनी, नारायण शिलावट, पराग कानडे, राधाकृष्ण सोनवणे, भाऊसाहेब सांगळे, गोविंद जाधव, दत्तात्रय वाघ, माधवी अमृतकर, ज्योत्स्ना जाधव, चंद्रकला ठाकरे, आशा सांगळे, मिना कानडे, वंदना जाधव, शोभा कुरे, गायत्री शिंदे, सुनीता पवार आदींसह नागरिक उपस्थित होते.