नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हाधिकारी तथा प्रभारी महानगरपालिका आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा उद्योग मित्रच्या बैठकीमध्ये अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुर्दशा व येथील खड्ड्यांचा विषय जोरदार गाजला. निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी या विषयावर आवाज उठवल्यानंतर व जिल्हाधिकारी कथा प्रभारी महापालिका आयुक्त यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी अशी आग्रहपूर्वक मागणी केली. त्यानंतर महानगरपालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर तातडीने सिमेन्स समोरील व गरवारे ते एक्सलो पॉईंट या प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकरता यंत्रणा कामाला लागल्याचे चित्र आज दुपारी दिसून आले.
हे खड्डे बुजवत असताना सुद्धा माती मिश्रित मुरूम टाकत होते. यामुळे निमा व आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला तसेच पहिले पाण्याचा निचरा करा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार चेंबरची तोंडे मोकळे करून त्या ठिकाणी पाणी जाण्याची वाट केली. शास्त्रोक्त पद्धतीने बंद कराण्यासाठी स्वतः जागेवर उपस्थित राहून कामगारांना सूचना केल्या
याप्रसंगी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आयमाचे हेमंत खोंड तसेच निमाचे खजिनदार राजेंद्र वडनेरे आयमाचे कुंदन दरंगे, महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता पिके गुंजाळ , दिलीप रत्नपारखी आदींसह मिस्तरी व इतर कर्मचारी होते.