शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या इशार्यानंतर यंत्रना लागली कामाला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या इशार्यानंतर गोविंदनगरच्या मुख्य रस्त्यावरील चिखल गुरुवारी, २० जुलै रोजी हटविण्यात आला. पाण्याच्या फवार्याने रस्ता धुवून काढण्यात आला.
आर डी सर्कल, बाजीरावनगर कॉर्नर ते इंडिगो पार्कपर्यंत खासगी बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. डंपर व इतर वाहने, तसेच बांधकाम साईटवरील चिखल रस्त्यावर आल्याने चारचाकी वाहने चालविणे कठीण झाले होते. अनेक दुचाकी घसरल्याने काहींना किरकोळ दुखापतीही झाल्या. सकाळ, सायंकाळ या रस्त्यावरून जॉगिंगला जाणार्यांची संख्याही मोठी आहे, त्यांनाही त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावरील चिखल त्वरित हटवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांनी नागरिकांच्या वतीने दिला होता. महापालिका नगर रचना विभागाने संबंधित बांधकाम व्यावसायिकांना सूचना दिल्या.
आज गुरुवारी जेसीबीने रस्त्यावरील चिखल हटविण्यात आला, पाण्याचे फवारे मारून रस्ता धुवून काढण्यात आला. दखल घेतल्याबद्दल नगर रचना विभाग व संबंधितांचे बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगीता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, विनोद पोळ, डॉ. शशीकांत मोरे, विठ्ठलराव देवरे, भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, अशोक देवरे, निलेश ठाकूर, भारती देशमुख, वंदना पाटील, दिलीप निकम, बापूराव पाटील, राहुल काळे, पुरुषोत्तम शिरोडे, दीपक दुट्टे, तेजस अमृतकर, प्रथमेश पाटील, हरिष काळे आदींनी आभार मानले आहेत.