नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष व जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक रामभाऊ गायटे यांचे आज सकाळी काठे गल्लीतील त्यांच्या निवासस्थानी दुखद निधन झाले. इच्छेप्रमाणे त्यांच्या देहदानाचा कार्यक्रम दुपारी झाला.
५४ दिवसाचा ऐतिहासिक संपाचे जेष्ठ नेतृत्व त्यांनी केले होते. राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष, कृतिशिल निवृत्त संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक, भगीरथ प्रकल्प, नागरी सेवा प्रबोधिनीचे संस्थापक अशा विविध पदावर त्यांनी काम केले. स्वर्गीय कर्णिक साहेबांचे ते कृतिशिल सहकारी होते.सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात त्यांचे मोठे काम होते.
त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणी विश्वास काटकर, अध्यक्ष अशोक दगडे, सुरेंद्र सुर्वे, अविनाश दौंड, सरतापे व किलोस्कर यांच्यासह नाशिक जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ, सरचिटणीस सुनंदा जरांडे, संपर्क प्रमुख श्यामसुंदर जोशी, जितेंद्र पालवे, रविंद्र पवार व पदाधिकारी यांनी श्रध्दांजली अर्पण केली.