नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक २४ मध्ये मोकाट कुत्र्यांमुळे रहिवाशी हैराण झाले आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने महापालिकेकडे केली आहे.
उंटवाडी, जुने सिडको, बडदेनगर, गोविंदनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, जगतापनगर, कालिका पार्क, मंगलमूर्तीनगर, सद्गुरूनगर, बाजीरावनगर, सदाशिवनगर, पांगरे मळा, खोडे मळा, काशिकोनगर, भुजबळ फार्म परिसर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी आदी भागात गेल्या काही दिवसात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार, वृद्ध नागरिक व महिलांना त्रास होत आहे. कुत्र्यापासून बचाव करण्याच्या प्रयत्नात व कुत्र्याच्या हल्ल्यात काही नागरिक किरकोळ जखमीही झाले आहेत. आवश्यक त्या उपाययोजना करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीचे निवेदन महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांना गुरुवारी, २२ जून २०२३ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले आहे.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगीता देशमुख, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, विठ्ठल देवरे, भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, दिलीप निकम, बापूराव पाटील, नीलेश ठाकूर, डॉ. शशीकांत मोरे, मनोज वाणी, सतीश मणिआर, अशोक पाटील, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, मीना टकले, वंदना पाटील, दीपक दुट्टे, राहुल काळे, हरिष काळे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर आदींनी ही मागणी केली आहे. प्रभागात मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी दिले.