नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नरफाटा भागातील दोन तरुण नाशिकरोड परिसरातील दारणा नदीवरील महापालिकेच्या चेहेडी बंधाऱ्यात पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याची घटना घडली. सिद्धार्थ गांगुर्डे व राहूल महानुभाव हे दोघे पाण्यात उतरले. परंतु, उलट्या प्रवाहात सापडल्याने त्यांना बाहेर निघणे मुश्किल झाले होते. त्यांनी बाहेर निघण्यासाठी मदत मागितली. मात्र तोपर्यंत त्यांचा दम झाल्याने ते बुडाले.
यानंतर दोन– तीन तासाने त्यांचे सहकारी संतोष मुकणे याने घरी येवून याबाबत सांगितले. त्यांनी त्वरीत आग्निशमन दलास कळविले. अग्निशमन दलाचे रामदास काळे, राजेंद्र आहिरे, उमेश गोडसे, शिवाजी खुळगे, अशोक निलमणी, बाजाराव कापसे, राजेद्र खर्जुल, तानाजी भास्कर यांनी शोध मोहिम सुरु केली.
अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते. चेहेडी येथील दारणा नदीला आवर्तन सुरु असून नाशिक महापालिकेच्या चेहेडी बंधाऱ्याचे गेट उघडण्यात आले आहे. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास चार युवक अंघोळीसाठी गेले होते. त्यावेळेस ही घटना घडली.