नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रभाग क्रमांक २४ मध्ये डासांचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांची झोप उडाली आहे. या भागात त्वरित सर्व्हे करून डास निर्मूलन मोहीम राबवावी, आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने महापालिकेकडे केली आहे. मलेरिया विभागाचे जीवशास्त्रज्ञ राजेंद्र त्र्यंबके यांना मंगळवार, दि. ९ मे रोजी हे निवेदन देण्यात आले आहे.
प्रभाग २४ मधील जुने सिडको, फिरदोस कॉलनी, गोविंदनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, कालिका पार्क, उंटवाडी, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, सदाशिवनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खोडे मळा, काशिकोनगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी, भुजबळ फार्म या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक महिन्यांपासून या प्रभागात धूर फवारणीचे वाहन येत नाही. मलेरिया विभागाकडून संबंधित एजन्सीला डिझेल पुरवठ्याचे प्रमाण कमी केल्यामुळे ही फवारणी केली जात नसल्याचे संबंधितांनी सांगितले आहे.
प्रभाग क्रमांक २४ मध्ये सर्व भागात संबंधित वाहनाद्वारे धूर फवारणी करावी, डासांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणावा, डासांची उत्त्पत्तीस्थाने शोधून ती नष्ट करावी, त्यांचे प्रमाण वाढण्याची कारणे शोधावी, यासाठी सर्व्हे करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, नीलेश ठाकूर, यशवंत जाधव, संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, गोविंदनगर ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, बापूराव पाटील, डॉ. शशीकांत मोरे, विनोद पोळ, श्रीकांत नाईक, मनोज वाणी, अशोक पाटील, शैलेश महाजन, बाळासाहेब तिडके, मगन तलवार, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, दीपक दुट्टे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, हरिष काळे, प्रथमेश पाटील आदींनी केली आहे. त्वरित कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.