नाशिक – गोविंदनगर येथे सोमवारी, १ मे रोजी श्री गणपती हास्ययोगा क्लबचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रभाग क्रमांक २४ मधील गोविंदनगर येथील गणपती मंदिराच्या उद्यानात भारती देशमुख, शशिकला धारणकर यांच्या पुढाकाराने हा हास्ययोगा क्लब सुरू करण्यात आला. सायंकाळी सहा ते सात या वेळेत हा क्लब सुरू राहणार आहे. शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भालचंद्र रत्नपारखी, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी हास्ययोगाचे काही प्रकार सादर करण्यात आले. परिसरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी या योगा क्लबचा फायदा होईल, असे यावेळी गायकवाड यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, प्रभाकर खैरनार, संगीता देशमुख, डॉ. राखी मुथा, दत्तात्रय वाणी, कृष्णाजी विसावे, बाळकृष्ण बागुल, सुदाम निकम, यशवंत बागुल, ओमप्रकाश शर्मा, अशोक पालवे, अशोक पाटील, सतिश मणिआर, टी. टी. सोनवणे, मंगला देवरे, विमल याळीज, लता वाणी, शालिनी कुलकर्णी, यशोदाबाई अमृतकर, लता सावळे, वंदना पाटील, संध्या गांगुर्डे, लताबाई भामरे, इंदुबाई वाघ, सविता नाईक, शकुंतला कोठावदे, अनिता निकम, पुष्पावती संधान आदींसह रहिवाशी हजर होते.