नाशिक – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक २४ मध्ये नाशिकमधील एकमेव पहिली रात्रीची घंटागाडी सुरू आहे. या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्याने सोमवारी, १ मे रोजी गोविंदनगर येथे रहिवाशांनी जल्लोष साजरा केला, घंटागाडी कामगारांचा सत्कार केला.
प्रभाग क्रमांक २४ मधील नोकरी, व्यवसायानिमित्त सकाळी लवकर घराबाहेर पडणार्या नागरिकांना दिवसाच्या घंटागाडीत कचरा टाकणे शक्य होत नाही. परिणामी, हा कचरा मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला नदी, नाल्यात, ठिकठिकाणी टाकला जात होता. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होत होती. रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येत होते. नागरिकांची सोय व्हावी, रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी रहिवाशी भागात रात्रीची घंटागाडी सुरू करावी, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने महापालिकेकडे करण्यात आली. पाठपुराव्यानंतर या प्रयत्नांना यश आले.
२१ एप्रिल २०२२ पासून प्रभाग २४ मध्ये गोविंदनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, सदाशिवनगर, सद्गुरूनगर, कालिका पार्क, जगतापनगर, बाजीरावनगर आदी भागात रात्रीच्या घंटागाडीची सुविधा सुरू आहे. याला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सोमवारी, १ मे रोजी गोविंदनगर येथे गणपती मंदिरासमोर रहिवाशांनी जल्लोष केला, पेढे वाटप केले. शाल, श्रीफळ देवून घंटागाडी कामगारांचा सत्कार केला. महापालिकेचे आभार मानले. यावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, प्रभाकर खैरनार, संगीता देशमुख, विठ्ठलराव देवरे, भालचंद्र रत्नपारखी, भारती देशमुख, शशिकला धारणकर, डॉ. राखी मुथा, दत्तात्रय वाणी, कृष्णाजी विसावे, बाळकृष्ण बागुल, सुदाम निकम, यशवंत बागुल, ओमप्रकाश शर्मा, अशोक पालवे, अशोक पाटील, सतिश मणिआर, टी. टी. सोनवणे, मंगला देवरे, विमल याळीज, लता वाणी, शालिनी कुलकर्णी, यशोदाबाई अमृतकर, लता सावळे, वंदना पाटील, संध्या गांगुर्डे, लताबाई भामरे, इंदुबाई वाघ, सविता नाईक, शकुंतला कोठावदे, अनिता निकम, पुष्पावती संधान आदींसह रहिवाशी हजर होते.