नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झाली आहे. दुपारच्या सुमारास कळवण लगतच्या मानूर परिसरात गारा पडल्या तर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे काढून ठेवलेला कांदा पावसाने भिजला.
नांदगाव तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास नांदगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांत मोठी गारपीट व वदळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा चांगलाच धास्तावला असून अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिरावत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे.