नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -गोविंदनगर, कर्मयोगीनगरसह प्रभाग क्रमांक २४ मधील उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात गाजरगवत वाढले आहे, कचर्याचे ढिग साचले आहेत. ते हटविण्यासाठी पाहणी करून उद्यानांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या पदाधिकार्यांनी केली. याबाबतचे निवेदन बुधवारी, ३० नोव्हेंबर २०२२ रोजी महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना देण्यात आले आहे.
जुने सिडको, गोविंदनगर, कालिका पार्क, उंटवाडी, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, बडदेनगर, मंगलमूर्तीनगर, पांगरे मळा, खोडे मळा, काशिकोनगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी आदी भागात महापालिकेची उद्याने आहेत. अनेक उद्यानांमध्ये कचर्याचे ढिग साचलेले आहेत. टवाळखोर, दारूड्यांचा वावर असल्याने बाटल्यांचे खचही आहेत. निर्माल्य व इतर कचरा काही उद्यानांमध्ये टाकला जातो. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजरगवत व इतर झाडीझुडूपे वाढली आहेत. सर्पांचा वावरही मोठ्या प्रमाणात असतो. यामुळे नागरिकांच्या जीविताला, आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. उद्यानांची पाहणी करून तेथे स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्या चारूशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, यशवंत जाधव, निलेश ठाकूर, संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे, सखाराम देवरे, आर. आर. जाधव, गोविंदनगर ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, अशोक देवरे, दिलीप निकम, नवे नाशिक ज्येष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाणे, बापूराव पाटील, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, मनोज पाटील, संजय टकले, मनोज वाणी, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, दिलीप दिवाणे, विनोद पोळ, श्रीकांत नाईक, बाळासाहेब तिडके, मगन तलवार, अशोक पाटील, सुनीता उबाळे, रूपाली मुसळे, मीना टकले, वंदना पाटील, दीपक दुट्टे, राहुल काळे, हरिष काळे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, प्रथमेश पाटील आदींसह रहिवाशांनी केली आहे.








