नाशिक -दोन वर्षांपासून नादुरुस्त असलेले गोविंदनगर येथील जॉगिंग ट्रॅकवरील ग्रीन जीमचे साहित्य अखेर दुरूस्त करण्यात आले आहे. यामुळे ही ग्रीन जीम पूर्ववत सुरू झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश आले असून, महापालिका अधिकार्यांचे आभार मानण्यात आले आहे.
गोविंदनगर येथील स्वर्गीय शिवराम वझरे जॉगिंग ट्रॅकवरील इंडिगो पार्कजवळील ग्रीन जीमचे साहित्य दोन वर्षांपासून नादुरुस्त झाले होते. यामुळे ही जीम निरुपयोगी झाली होती. नागरिकांच्या मागणीनुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारूशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्यासह पदाधिकार्यांनी महापालिकेकडे सतत पाठपुरावा केला. शुक्रवारी, दि. २५ नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या ठेकेदाराने हे साहित्य दुरुस्तीसाठी नेले. मंगळवारी, दि. २९ नोव्हेंबर रोजी दुरूस्त केलेले साहित्य पुन्हा बसविण्यात आले. यामुळे ही ग्रीन जीम पूर्ववत सुरू झाली.
शिवसेना कार्यकर्त्या चारूशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, यशवंत जाधव, निलेश ठाकूर, संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे, सखाराम देवरे, आर. आर. जाधव, गोविंदनगर ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, अशोक देवरे, दिलीप निकम, नवे नाशिक ज्येष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाणे, बापूराव पाटील, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, मनोज पाटील, मनोज वाणी, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, दिलीप दिवाणे, विनोद पोळ, श्रीकांत नाईक, बाळासाहेब तिडके, मगन तलवार, अशोक पाटील, सुनीता उबाळे, रूपाली मुसळे, वंदना पाटील, दीपक दुट्टे, राहुल काळे, संजय बाविस्कर, अरुण घोरपडे, राजेंद्र वडनेरे, सी. आर. पाटील, सुनील पाटील, कृष्णा फसाटे, अरविंद धामणे, राजेंद्र आहेर, हरिष काळे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, प्रथमेश पाटील आदींसह रहिवाशांनी महापालिका अधिकार्यांचे आभार मानले आहेत.