नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकचे प्रथितयश बांधकाम व्यावसायिक सुप्रसिद्ध कवी लेखक गीतकार तसेच सावाना सांस्कृतिक समिती सदस्य संतोष हुदलीकर यांचा मुलगा कौस्तुभ (२९) हिमाचल प्रदेश येथे ट्रेकिंगला गेला असता त्याचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्याच्या मागे आई वडील पत्नी लहान मुलगा असा परिवार आहे. हुदलीकर कुटुंबीयाचे निवासस्थान इंदिरानगर येथे आहे. कौस्तुभचा अंत्यविधी उद्या शनिवारी होणार आहे. ही दुर्दैवी घटना कळाल्यानंतर हुदलीकर कुटुंबियांच्या मित्रांनी व नाशिक कवीच्या सदस्यांनी हळहळ व्यक्त करत श्रध्दांजली अर्पण केली आहे.